मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.मुंबई विद्यापीठाच्या एमए आॅनर्सचा पब्लिक पॉलिसी, एमएचा इंटरनॅशनल अॅन्ड ग्लोबल अफेर्स, बीए पाचव्या सत्राचा इस्लामिक स्टडी या विषयांचे पेपर आणि एमएससीच्या वेगवेगळ््या विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षा शुक्रवारी पार पडणे अपेक्षित होते. मात्र मुसळधार पावसामुळे ठप्प पडलेल्या मुंबईत परीक्षार्थींना केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे भोंडे यांनी सांगितले.दरम्यान, पीएचडीच्या परीक्षेसाठी गुजरातहून एक परीक्षार्थी विमानाने मुंबईत आला होता. मात्र नियोजित वेळेत फोर्टपर्यंत पोहोचणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे तत्काळ त्याच्या केंद्रात बदल करून कलिना विद्यापीठात त्याची परीक्षा घेण्यात आली.आज शाळा, कॉलेज बंदहवामान खात्याने शनिवारीही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शिक्षण विभागाने मुंबईतील सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शनिवारी शाळा आणि कॉलेजमध्ये न जाण्याचे आवाहन केले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
By admin | Updated: June 19, 2015 22:53 IST