शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

तीन दशकापासून पोस्टमन भरतीला मुहूर्तच नाही!

By admin | Updated: July 8, 2014 21:55 IST

सन १९८२ मध्ये पोस्टमनची शेवटची भरती झाली होती.

वाशिम: सन १९८२ मध्ये पोस्टमनची शेवटची भरती झाली होती. तेव्हापासून भरती बंद करण्यात आली. उलट पाचव्या वेतन आयोगात पोस्टमनसह १0 टक्के कर्मचार्‍यांची कपात करण्यात आलीजागतिकीकरण, बाजारीकरण तथा शहरीकरणाच्या स्पर्धेत अस्तित्व टिकविण्यासाठी पोस्ट कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्याचा डांगोरा पिटणार्‍या टपाल विभागाला तब्बल ३0 वर्षापासून पोस्टमनची भरती करण्याला मुहूर्त गवसला नाही. परिणामी टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमनची संख्या कमालीची रोडावली. सन २0११ मध्ये राज्यभरात २७६७१ ्रपोस्टमन कार्यरत होते. मात्र सन २0१३- २0१४ मध्ये ही संख्या २0 हजार ५0४ पर्यत घटली आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून दळणवळणाच्या क्षेत्रात पोस्टाची मक्तेदारी राहिली आहे. काही वर्षापर्यंत पोस्टाच्या सेवेशिवाय संपर्काचे साधन नव्हते. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निरोप, खुशाली, नोकरीविषयक पत्रे तसेच अन्य महत्वपूर्ण कागदपत्रासाठी पोस्टमनचीच वाट पाहावी लागत होती. परंतु गेल्या सात-आठ वर्षात परिस्थिती बदलली आहे. स्पर्धात्मक युगामध्ये खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण व बाजारीकरणामुळे पोस्टाशिवाय अन्य माध्यमातूनही जनतेला विविध प्रकारच्या सेवासुविधा मिळू लागल्या आहेत. याचा विपरित परिणाम पोस्टावर होऊ लागला आहे. पोस्टाची होणारी अधोगती थांबविण्यासाठी टपाल विभागाने प्रोजेक्ट अँरो सारख्या विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्यातून पोस्ट कार्यालयांचे आधुनिकरण करण्यात आले आहे.परंतु आधुनिकरण करीत असताना टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमॅनकडे या विभागाचे सपशेल दुर्लक्षच झाले आहे. सन २0११- १२ मध्ये राज्यभरात तब्बल २७ हजार ६७२ पोस्टमन होते. यामध्ये २0 हजार ३८५ ग्रामिण भागात तर ७२८६ शहरी भागात कार्यरत होते. सन २0१२- २0१३ मध्ये पोस्टमॅनची ही संख्या घटून २७ हजार २५४ झाली. यामध्ये शहरी भागातील ६२५५ तर ग्रामिण भागातील २0 हजार ९९९ पोस्टमॅनचा समावेश होता. सन २0१३ - २0१४ मध्ये ही संख्या पुन्हा घटली. आजमितीला शहरी भागात ५९६0 तर ग्रामिण भागात २0 हजार ५0४ पोस्टमॅन कार्यरत आहेत.