शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तर वैद्यकीय, दंत अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना राखीव जागा

By admin | Updated: April 30, 2017 03:12 IST

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाला सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाला सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. देशपातळीवर प्रवेश परीक्षा सुरू झाल्यानंतरही काही राज्ये स्थानिक पातळीवरील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राधान्य देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अन्य राज्यांत प्रवेश मिळवणे अवघड होते. यामुळे राज्यातून एमबीबीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आणि राज्याचे अधिवासी उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील डॉक्टरांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. अभिमत विद्यापीठात आणि खासगी विनाअनुदानित महाविद्यालयातील पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांसाठी राज्य कोट्यातील ५० टक्के जागांमधील प्रवेश देताना राज्यातून एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या आणि महाराष्ट्र अधिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तर, संस्था पातळीवरील ३५ टक्के जागांपैकी ५० टक्के (एकूण जागांच्या १७.५ टक्के) जागा उमेदवारांसाठी राखीव आहेत. १५ टक्के जागा या अनिवासी भारतीय कोट्यासाठी असून त्या अखिल भारतीय गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)