शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 06:00 IST

गृह विभागाकडे प्रस्ताव : आपत्ती निवारणाचे शास्त्रोक्त व अद्ययावत प्रशिक्षण देणार

- जमीर काझी

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यभरात आगीच्या घटनांत वाढ झाली आहे. अशा प्रसंगी त्वरित बचावकार्य न पोहोचल्यामुळे सामान्य दुर्घटनांतही मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहेत. महाराष्टÑ नागरी संरक्षण दलाने आपत्ती व्यवस्थापनाचा एका वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला आहे.

आतापर्यंत महाराष्टÑ नागरी संरक्षण दलाच्या वतीने मानसेवी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत होते. मात्र, विशेष अभ्यासक्रम सुरू केल्याने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त व अद्ययावत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे दुर्घटनांना प्रतिबंध लागण्याबरोबरच बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव संचालनालयाचे संचालक संजय पाण्डेय यांनी गृह विभागाला सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास नवीन शैक्षणिक वर्षापासून तो कार्यान्वित होऊ शकणार आहे.

गेल्या काही महिन्यांत महानगर मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आग आणि इमारत दुर्घटना वाढल्या आहेत. त्यात वित्तहानीसोबतच जीवितहानीचे प्रमाणही वाढले आहे. अशा प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाला बचाव व मदतकार्य, प्राथमिक उपचाराची माहिती असणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे महाराष्टÑ नागरी संरक्षण दलातर्फे मुंबईतील महाविद्यालयांत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविण्यात आले.

त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून अभ्यासक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ महाविद्यालयाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता नसून प्रशिक्षणार्थींकडून आकारण्यात येणाºया शुल्कातून प्रशिक्षणासाठीचा खर्च निघू शकणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.