शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांनी फाडले भाजपा नेत्यांचे पोस्टर्स

By admin | Updated: June 28, 2016 21:31 IST

शिवसेना-भाजपा युतीमध्ये सोशल मिडिया, मुखपत्र व पोस्टरबाजीतून रंगत असलेला वाद आता रस्त्यावर आला आहे़ सोमवारी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनात उभय पक्षांचे कार्यकर्ते

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - शिवसेना-भाजपा युतीमध्ये सोशल मिडिया, मुखपत्र व पोस्टरबाजीतून रंगत असलेला वाद आता रस्त्यावर आला आहे़ सोमवारी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनात उभय पक्षांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर आज शिवसैनिकांनी पुन्हा भाजपाच्या नेत्यांचे पोस्टर्स फाडून आपला संताप व्यक्त केला़.

मित्रपक्षाविरोधातच शिवसैनिकांनी घोषणाबाजी देत निदर्शने केली़. यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत़. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बराच वेळा ट्विटरवर युद्ध रंगले आहे़. त्यानंतर शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून तर भाजपाने मनोगत या पाक्षिकातून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरुच ठेवल्या आहेत़. मात्र आतापर्यंत पोस्टर्स, सोशल मिडिया आणि शाब्दिक चकमकीपर्यंत असलेल्या या वादाचे रुपांतर सोमवारी घोषणाबाजी व निदर्शनामध्ये झाले़.

बोरिवली येथील भगवती रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी दिल्यानंतर आज हा रोष पुन्हा रस्त्यावर उतरला़ शिवसेना पक्षप्रमुख यांची तुलना शोलेमधील असरानीबरोबर भाजपाने केली होती़. त्यास प्रत्युत्तर देत शिवसैनिकांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार यांचे पोस्टर्स, पुतळा चर्चगेट स्थानकाबाहेर फाडले. तसेच त्यांना शकुनी मामा म्हणून संबोधले़ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.