शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पोस्टाने आलेला पदार्थ ‘स्फोटक’च!

By admin | Updated: July 14, 2015 00:39 IST

संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये टपालाद्वारे प्लास्टिक पिशवीमधून पाठवण्यात आलेली पावडर ‘स्फोटक’च असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतचा अंतिम अहवाल

पुणे : संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये टपालाद्वारे प्लास्टिक पिशवीमधून पाठवण्यात आलेली पावडर ‘स्फोटक’च असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतचा अंतिम अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून येणे बाकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.विश्रामबाग पोलिसांनी स. प. महाविद्यालय पोस्ट आॅफिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिवसभरात दहा ते बारा जणांची पोलिसांनी चौकशी केली.कन्या शाळेजवळील जिजाई प्रकाशनाच्या कार्यालयामध्ये शनिवारी टपालाद्वारे एक डिटोनेटर आणि एक स्फोटक पदार्थ पाठवण्यात आला होता. संघटनेचे राज्य संघटक अजय भोसले यांच्या नावाने आलेले हे पार्सल रविवारी उघडल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पार्सलवर स. प. महाविद्यालय पोस्ट आॅफिसचा शिक्का असल्याने आरोपी पुण्यातील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. खोडसाळपणामुळे केलेले हे कृत्य आहे की खरोखरीच दहशत पसरवण्यासाठी पार्सल पाठवण्यात आले आहे, याचाही तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांनी दिली.संबंधित पदार्थांची बॉम्बशोधक व नाशक तसेच श्वान पथकाने तपासणी केली होती. तेव्हा हा पदार्थ स्फोटकच असल्याचे निष्पन्न झाले होते. ही पावडर आणि डिटोनेटर न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल पुढील दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)