शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच सेवेने पोस्टाची वर्षभरात २८ कोटींची कमाई

By admin | Updated: June 30, 2016 04:40 IST

आरटी्ओत फेऱ्या माराव्या लागत असल्याने परिवहन विभागाकडून चालक परवाना पोस्टाने घरपोच देण्याची सुविधा काही वर्षांपूर्वी सुरु केली.

मुंबई : वाहन चालक परवान्यासाठी आरटी्ओत फेऱ्या माराव्या लागत असल्याने परिवहन विभागाकडून चालक परवाना पोस्टाने घरपोच देण्याची सुविधा काही वर्षांपूर्वी सुरु केली. राज्यात सुरु झालेली ही सुविधा पोस्ट विभागाला चांगलीच फायदेशीर ठरील असून या सेवेतून वर्षभरात २८ कोटींची कमाई केली आहे. चालक परवान्याबरोबरच वाहन नोंदणी प्रमाणपत्रही घरपोच देण्याचे काम पोस्ट खात्याकडून केले जाते. परिवहन विभागाकडून राज्यात मोठ्या प्रमाणात चालक परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणत्र दिले जातात. सुरुवातीला वाहन चालविण्याच्या परिक्षेत पास झाल्यानंतर लायसन्स मिळवण्यासाठी बऱ्याच खेटा चालकांना आरटीओत माराव्या लागत होत्या. त्यात चालकांचा बराच वेळ जात होता आणि बरीच गर्दीही आरटीओत होत होती. त्याचप्रमाणे दलालांकडूनही त्याचा गैरफायदा घेतला जात होता. यातून चालकांची सुटका करण्यासाठी चालकांना लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र पोस्टामार्फत घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सुविधा सुरु केल्यानंतर पोस्टमनला सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यात चालकांकडून चुकीचा पत्ता दिल्याने किंवा घराचा पत्ता बदलल्याने लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र पुन्हा पोस्टात येत होते. त्यानंतर पोस्टाकडून आरटीओमार्फत चालकांना योग्य पत्ता देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर परवाना आणि प्रमाणपत्र चालकांना योग्य पत्त्यावर मिळण्याचे प्रमाण बरेच वाढले.या सुविधेमुळे पोस्ट विभागाला चांगली कमाई करता आली आहे. एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ पर्यंत ६0 लाख ८२ हजार २६४ लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्राची बुकींग राज्यातील विविध पोस्टामार्फत करण्यात आली आहे. त्यातून तब्बल २८ कोटी ६३ लाख ७६ हजार ३२0 रुपये एवढी कमाई केल्याचे सांगण्यात आले. एक लायसन्स आणि प्रमाणपत्र घरपोच देण्यामागे ४५ रुपये आकारणी केली जाते. या आकारणीत पोस्ट फी, स्टॅम्प इत्यादीचा समावेश असतो. (प्रतिनिधी)>१४ हजार ५३१ परवाने पुन्हा पोस्टात२0१६ च्या जानेवारी ते मे पर्यंत ताडदेव आरटीओकडून १ लाख ६0 हजार १८२ परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र पोस्टामार्फत चालकांना त्यांच्या पत्त्यावर पाठवण्यात आले. मात्र १४ हजार ५३१ परवाने आणि प्रमाणपत्र चालकांना मिळालेच नाहीत. चुकीचा पत्ता नमूद करण्यात आल्याने ते चालकांच्या योग्य पत्त्यावर पोहोचू शकले नसल्याची माहिती पोस्टाकडून देण्यात आली.