शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी भाजपात मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: March 1, 2017 01:17 IST

महापालिकेच्या १३ व्या सभागृहातील ५६ व्या महापौरपदाचा मान भारतीय जनता पार्टीने बहुमतातून मिळवला आहे.

पुणे : महापालिकेच्या १३ व्या सभागृहातील ५६ व्या महापौरपदाचा मान भारतीय जनता पार्टीने बहुमतातून मिळवला आहे. या पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची, याचा निर्णय पक्षाला १५ मार्चपूर्वी घ्यावा लागणार आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असलेल्या या मानाच्या पदासाठी पक्षातील इच्छुक महिलांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून समर्थकांच्या माध्यमातून दावा पक्का करण्याचा प्रयत्न काहींनी सुरू केला आहे.महापालिकेच्या सन १९५० पासूनच्या इतिहासात प्रथमच भाजपाला १६२ सदस्यांच्या सभागृहात ९८ संख्येचे बहुमत मिळाले आहे. निवडून आलेल्या ९८ सदस्यांमध्ये या पदासाठी पक्षाकडून ज्येष्ठता, अनुभव, शिक्षण, कोरी पाटी यासारख्या निकषांबरोबरच राजकारणातून येणारे अन्य काही निकषही लावले जाण्याची चिन्हे आहेत. पुणेकरांना पसंत पडेल, असाच महापौर देण्याची जबाबदारी पक्षाला पार पाडावी लागणार आहे.पक्षात या पदासाठी पात्र महिलांची संख्या बरीच आहे. प्रामुख्याने मुक्ता टिळक, वर्षा तापकीर, मंजूषा नागपूरे, माधुरी सहस्रबद्धे, मानसी देशपांडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपात प्रवेश करून स्वत:बरोबरच प्रभागातील अन्य तीन जागाही निवडून आणणाऱ्या रेश्मा भोसले याही या पदासाठी इच्छुक आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठींना १५ मार्चपूर्वी ही निवड करावी लागेल. मावळत्या सभागृहाची मुदत १४ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे आता या पदासाठीच्या इच्छुकांनी आपला दावा पक्का करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेत्यांना थेट सांगण्याऐवजी समर्थकांच्या माध्यमातून नाव पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत आहे. नव्या सभागृहाची पहिली सभा १५ मार्चला होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याच सभेत महापौरपदाची निवडणूक होईल. त्यानंतर नव्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौरांची निवड होईल. त्यानंतर सभागृह ठरवेल त्यादिवशी विषय समितीच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेतली जाईल. (प्रतिनिधी)>या पदाचा प्रमुख दावेदार असलेल्या मुक्ता टिळक यांची महापौरपदावर निवड झाली, असा मेसेज सोशल मीडियावरून दिवसभर फिरत होता. शहरात सर्वत्र याचीच चर्चा होती. अखेरीस स्वत: मुक्ता टिळक यांनीच टिष्ट्वटरवरून पक्षाने अशी कोणतीच घोषणा केली नसल्याचा खुलासा केला व समर्थकांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल त्यांचे आभार मानले.