शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेमुळे मुंबईतील ६ मार्चचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित

By admin | Updated: February 26, 2017 21:17 IST

६ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आल्याचा निर्णय, रविवारी औरंगाबादेत पार पडलेल्या

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 6 -  ६ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आल्याचा निर्णय, रविवारी औरंगाबादेत पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला,अशी माहिती मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. दहावी, आणि बारावी बोर्ड परीक्षेचे कारण मोर्चाच्या स्थगितीसाठी असल्याचे संयोजकांनी सांगितले.मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ६ मार्च रोजी मराठा क्रांती मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून या मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर बैठकांही सुरू झाल्या होत्या. दरम्यान ६मार्च रोजी दहावी बोर्ड परीक्षा असल्याचे समोर आले. या परीक्षांमुळे दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मोर्चात सहभागी होता येणार नसल्याने मोर्चा पुढे ढकलावा,अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी एमजीएमच्या रूख्मिणी सभागृहात दिवसभर मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. राज्यातील २९ जिल्ह्याचे मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत मुंबईतील मोर्चाबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालकांचे म्हणने विचारात घेऊन ६ मार्च रोजीचा मुंबईतील मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. मुंबईतील मोर्चाची पुढील तारीख निश्चित करण्यासाठी लवकरच औरंगाबादेत राज्ययस्तरीय कोअर कमिटी बैठक होणार आहे. बैठकीत निषेधाचे दोन ठरावआजच्या बैठकीत सैन्य दलातील जवांनाच्या पत्नींचे चारित्र्यहणन करणारे विधान करणारे पंढरपूर येथील आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधाचा आणि शांततेच्या मार्गाने चक्का जाम करणाऱ्या औरंगाबादेतील मराठा तरुणांवर मुद्दामहून लाठीहल्ला करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यालय औरंगाबादेत आणि अराजकीय सदस्यांची राज्यस्तरीय कोअर कमिटीआतापर्यंत ५७ मूकमोर्चे काढण्यात आले. या मोर्चाने संपूर्ण जगाला शिस्त आणि संयमाचे दर्शन जगाला घडविले आहे. मुंबईतील मोर्चाही विनागालबोट व्हावा,यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर कोअर कमिट्या स्थापन केल्या जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी सात सदस्य राज्यस्तरीय कोअर कमिटीचे सदस्य असेल. आणि राज्यस्तरीय कमिटीवरील सर्व सदस्य अराजकीय असतील. आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही निर्णय ही कोअर कमिटीच घेईल.कोअर कमिटीशिवाय मराठा क्रांती मोर्चाबद्दल कोणी कोणतीही भूमिका मांडल्यास ती त्या व्यक्तीची वैयक्तीक भूमिका असेल. शिवाय मराठा क्रांती मोर्चाने कोणासही प्रवक्ता म्हणून नियुक्त केलेले नाही.