शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रोथ सेंटरची शक्यता धूसर

By admin | Updated: August 27, 2016 04:19 IST

राज्य सरकारने घेतलेला आखडता हात यामुळे सध्या तरी कल्याण ग्रोथ सेंटरची शक्यता धूसर होऊ लागली आहे.

मुरलीधर भवार,

कल्याण- गावांचा विरोध, कंत्राटांसाठी सुरू असलेली राजकीय रस्सीखेच, नियोजन प्राधिकरणांची भाऊगर्दी, गेल्या २० वर्षांत ग्रोथ सेंटरच्या कामात न झालेली प्रगती आणि निधी देण्यात राज्य सरकारने घेतलेला आखडता हात यामुळे सध्या तरी कल्याण ग्रोथ सेंटरची शक्यता धूसर होऊ लागली आहे. पालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांपैकी १० गावांमध्ये ग्रोथ सेंटरच्या उभारणीचे काम एमएमआरडीएतर्फे केले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार एक हजार ८९ कोटींचा निधी देणार आहे. मात्र त्यात नियोजन प्राधिकरणांची भाऊगर्दी असल्याने ते अस्तित्वात येणार की नाही, याविषयी प्रचंड गोंधळ आहे.कल्याण ग्रोथ सेंंटरची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली. त्यासाठी राज्य सरकारने एक हजार ८९ कोटी मंजूर केले. त्यासाठी २७ पैकी १० गावांच्या जमिनी निवडल्या, पण त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. ग्रोथ सेंटरचे काम सुरु करण्यापूर्वी नियोजन प्राधिकरणाचा पेच होता. २७ गावांच्या विकासाचा आराखडा एमएमआरडीने तयार केला होता, तर ही गावे राज्य सरकारने गेल्या वर्षी जूनमध्ये महापालिकेत समाविष्ट केली. आता त्यातील १० गावांत ग्रोथ सेंटर होणार असल्याने त्यासाठी एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण असेल, तर उर्वरित १७ गावे पालिकेच्या ताब्यात असतील. हा पेच सुटल्यावर नियोजन प्राधिकरणात सुस्पष्टता आली खरी, पण २७ गावांच्या हद्दीत डोंबिवली औद्योगिक वसाहत असल्याने तेथे काही अंशी एमआयडीसी नियोजन प्राधिकरण आहे. कल्याण शीळ रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे २७ गावाच्या भागात केडीएमसी, एमएमआरडीए, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एमआयडीसी अशा चार सरकारी संस्था असल्याने बहुविध नियोजन प्राधिकरणांच्या कामांत एकसूत्रता अद्याप आलेली नाही. >ग्रोथ सेंटरही बड्या बिल्डरांच्या फायद्यासाठीकल्याण-डोंबिवली महापालिकेने १९९६ मध्ये जो विकास आराखडा तयार केला होता, त्यातही कल्याण ग्रोथ सेंटर होते. ते विकसितच केले गेले नाही. त्यामुळे २०१५ मध्ये राज्य सरकारने कल्याण ग्रोथ सेंटरचा मुद्दा नव्याने पुढे करुन विकासासाठी एक हजार ८९ कोटी रुपये मंजूर केले. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून एमएमआरडीए हे ग्रोथ सेंटर विकसित करणार असली, तरी तेथे नागरी सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर राहणार आहे. भाजप सरकारने या ग्रोथ सेंटरसाठी निवडलेली गावे लोढा यांच्या पलावा सिटी, कासा रिओ, कासा बेला या बड्या प्रकल्पांच्या परीघातील आहेत. त्याबोवती अनेक बड्या विकसकांचे प्रकल्प होऊ घातले आहेत. त्यामुळे हे ग्रोथ सेंटर बड्या बिल्डरांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप मनसे करीत आहे. सर्वपक्षीय संघर्ष समितीही त्याच कारणाने ग्रोथ सेंटरला विरोध करीत आहे. निधीचे भिजत घोंगडेएमएमआयडीसीकडे स्वत:चा निधी नसल्याने त्यांच्या ताब्यातील परिसरात ते नागरी सुविधा पुरवू शकत नाहीत. त्यांचा भार अंतिमत: पालिकेवरच येतो. कल्याण-डोंबिवली महापालिकेलाही २७ गावांच्या विकासासाठी निधी मिळालेला नाही.महापालिकेने राज्य सरकारकडे २७ गावांच्या विकासासाठी दोन हजार ५०० कोटींच्या निधीची मागणी केली होती. त्यावर राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. २७ गावात रस्ते विकासासाठी तातडीने २३ कोटी निधी देण्याचे नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी एका बैठकीत मान्य केले होते. तो निधीही अद्याप महापालिकेला मिळाला नसल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी कबूल केले आहे. १० गावात कल्याण ग्रोथ सेंटरमुळे महापालिकेस तेथून विकास शुल्क मिळणार नाही.