शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम मतांमध्ये विभाजनाची शक्यता

By admin | Updated: February 18, 2017 17:04 IST

मुस्लिम मतांमध्ये विभाजनाची शक्यता

मुस्लिम मतांमध्ये विभाजनाची शक्यताअमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा वेग वाढला आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या रणागणांत पहिल्यांदाच उडी घेतलेल्या एमआयएम पक्षामुळे मुस्लिम मतांमध्ये विभाजन होणार आहे. याचा फटका मुस्लिम बहुल भागातील उमेदवारांना बसणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी, मुस्लिम लिग, व समाजवादी पार्टीसाठी नुकसानदायक ठरणारे आहे.मुस्लिम पक्षाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरी गेट, छायानगर, ताजनगर, लालखडी, आझाद कॉलनी, अंसारनगर, महेंदिया कॉलनी, वलगाव मार्ग, वाहेद कॉलनी, गुलिस्तानगर, जमिल कॉलनी, नूरनगर, रहेमतनगर, अलिमनगर, हैदरपुरा, ताजनगर, पाटीपुरा, आझाद कॉलनी, कमेला ग्राऊंड, पठाणपुरा, चपराशीपुरा आदी ठिकाणी मुस्लिम समाजाचे तारणहार म्हणून मिरविणाऱ्या तथाकथित नेत्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये जोरदार लढत आहे. एमआयएम पक्षाने यावेळी महापालिका निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात उभे केले आहे. एमआयएम पक्षनेत्यांच्या आक्रमक भाषणाने मुस्लिम मतांचे धु्रवीकरण अटक मानले जात आहे. एमआयएमच्या आक्रमकतेने विकास कामे, सर्वसमावेशक अशी झुल पांघरलेल्या समाजवादी पार्टीने देखील आक्रमकता स्वीकारली आहे. एमआयएम पक्षाकडे मुस्लिम समाजातील युवकांचा कल आहे. मुस्लिम मतांच्या धु्वीकरणाचा फटका सत्ता स्थापनेच्यावेळी काँग्रेसला बसण्याचे संकेत आहे.बडनेऱ्यातही मुस्लिम मतदारांचा प्रभाव४बडनेरा जुनिवस्तीत एमआयएम पक्षाचे चार उमेदवार रिंगणात आहेत. मुस्लिमबहुल भागात एमआयएमचा प्रभाव अधिक जाणवत आहे. एमआयएमने काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेला तगडे आव्हान उभे केले आहे. मुस्लिम समाजाच्या गठ्ठा मतांवर विजयाचे समीकरण एमआयएम जुळवीत आहे. चारपैकी दोन जागांवर विजय कसा खेचून आणता येईल, यावर एमआयएम नेत्यांचा भर आहे. तर अन्य पक्षाने किमान तीन जागेवर विजय मिळावा, यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे.