शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

मुंबईतील एक्स्प्रेस-वे महापालिकेच्या ताब्यात

By admin | Updated: December 16, 2015 01:53 IST

मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेले ‘एक्स्प्रेस वे’ आता महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात येतील. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्याचे अधिकार महापालिकेला असतील, असे सार्वजनिक

नागपूर : मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेले ‘एक्स्प्रेस वे’ आता महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात येतील. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्याचे अधिकार महापालिकेला असतील, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. मुंबईत ईस्टर्न, वेस्टर्न आणि फ्री वे असे ‘एक्स्प्रेस वे’ आहेत.पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले, ‘राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी लवकरच एक हजार कोटी रुपयांची कामे घेतली जातील. ३० एप्रिलपर्यंत ही कामे सुरू होऊन, मे पर्यंत पूर्ण होतील. रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला पाच वर्षापर्यंत संबंधित रस्त्याची देखभाल-दुरुस्ती करावी लागेल.’ ‘राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे ९० किमी लांबीचे रस्ते आहेत. जिल्हा परिषदेच्या रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी देता येत नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असतानाही टोलमुक्तीसाठी सरकारने ८०० कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले. चर्चेदरम्यान सदस्यांनी सुचविलेल्या कामांबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. रूजू न होणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करणारवर्षभरापूर्वी वैद्यकीय सेवेतील १५ हजार ३५६ पदे रिक्त होती. युतीचे सरकार आल्यानंतर ४ हजार ५३६ पदे भरण्यात आली. वारंवार सूचना देऊनही नियुक्तीच्या ठिकाणी रूजू न होणाऱ्या ४५० डॉक्टरांना बडतर्फ करण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान सांगितले. मिठागारांच्या जमिनीबाबत केंद्राचा अद्याप निर्णय नाही बृहन्मुंबईतील केंद्र शासनाच्या मालकीच्या मिठागाराच्या जमिनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी व परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी उपयोगात आणण्यासाठी राज्य शासनाकडे वर्ग करण्याबाबत, महाराष्ट्र शासनातर्फे वेळोवेळी विविध स्तरावर केंद्र सरकारशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला आहे, परंतु या संदर्भात केंद्र सरकारने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. डॉ. बालाजी किनीकर, अशोक पाटील, सुनील राऊत, अजय चौधरी, सुनील शिंदे, गणपत गायकवाड, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वैभव पिचड यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. शाळांचा दर्जा वाढविण्याबाबत मुंबई पालिकेतर्फे विविध योजना मुंबईतील महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी, महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. अ‍ॅड. आशिष शेलार, पराग अळवणी, रणजीत कांबळे, कालीदास कोळंबकर, प्रा. वीरेंद्र जगताप, अमिन पटेल, अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेच्या वतीने शाळेच्या दर्जा सुधारण्यासाठी २७ शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा, व्हर्च्युअल क्लास रूम प्रकल्प, टॅब वितरण, तीन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालये (यात महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश) आणि माध्यमिक शालांत परीक्षा अधिकतम निकाल देणाऱ्या शाळांना व विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस इ. योजना करण्यात आल्या आहेत