शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पॉस्को न्यायालयासाठी निधी देणार

By admin | Updated: March 6, 2016 03:33 IST

पॉस्को न्यायालयामध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी येत्या तीन दिवसांत २३ लाख रुपयांचा निधी देऊ, अशी माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : पॉस्को (प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल आॅफेन्सेस) न्यायालयामध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी येत्या तीन दिवसांत २३ लाख रुपयांचा निधी देऊ, अशी माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली.राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत ‘सू-मोटो’ दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकील एस. आर. नारगोळकर यांनी मुंबईत आणखी २ पॉस्को न्यायालये सुरू करणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने पॉस्को न्यायालयांबद्दल तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. पॉस्को न्यायालयासाठी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ३ लाख रुपये देण्यात आले असून, उर्वरित २३ लाख रुपये येत्या तीन दिवसांत देण्यात येणार आहेत, असे सरकारी वकिलांनी न्या. अभय ओक व न्या. आर. डी. धानुका यांच्या खंडपीठाला सांगितले.हा निधी वॉटर प्युरिफायर, शौचालये आणि मूलभूत सुविधा देण्यासाठी मंजूर केलेल्या ५३८ लाखांमधूनच देण्यात येणार असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.गेल्या वर्षी सरकारने कनिष्ठ न्यायालयांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी १३ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. (प्रतिनिधी)