शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लील छायाचित्र

By admin | Updated: July 15, 2017 23:11 IST

मुख्य अभियंता तडकाफडकी निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क--शिरगाव (चिपळूण) : व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर अश्लील छायाचित्र टाकल्याप्रकरणी महानिर्मिती कंपनीच्या कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील मुख्य अभियंता व्ही. एम. खोकले यांना शनिवारी तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. या ग्रुपमध्ये ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचाही समावेश आहे.महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी शनिवारी याबाबतचे आदेश जारी केले. १४ जुलैला रात्री १२ ते १ यादरम्यान खोकले यांनी व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर एक अश्लील छायाचित्र पोस्ट केले. हे वर्तन महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक कंपनी २०१५ सेवा विनिमय क्रमांक ८६ अनुसूचित ८८ (क) यानुसार गैरकृ त्यात मोडते. त्यामुळे हा आदेश काढण्यात आला. खोकले यांनी दर सोमवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात समक्ष हजेरी लावावयाची आहे. त्यांनी मुख्यालय सोडावयाचे नाही, अशी अट त्यांना घालण्यात आली आहे.आज १५ जुलैपासूनच यावर कार्यवाही करण्यात आली असून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे त्यांचा पदभारही देण्यात आल्याचे समजते.मंत्री असलेल्या ग्रुपवरचमुख्य अभियंता खोकले यांनी ‘एनर्जी मिनिस्टर लाईव्ह’ या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर हा अश्लील फोटो पोस्ट केला आहे. महानिर्मितीच्या दैनंदिन महत्त्वाच्या कामाबाबत हा ग्रुप सुरू करण्यात आला आहे. या ग्रुपवर इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचाही समावेश आहे.