शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; कुटुंबीयांना अ‍ॅट्रॉसिटीची धमकी

By admin | Updated: September 19, 2016 01:15 IST

तीन शाळकरी मुलींना खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याची घटना खेड तालुक्यातील वांजळे या गावी घडली.

राजगुरुनगर : पाचवी, सहावीत शिकणाऱ्या तीन शाळकरी मुलींना खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याची घटना खेड तालुक्यातील वांजळे या गावी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी, इयत्ता पाचवी आणि सहावीत शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींना आरोपी गंगाराम नामदेव खंडे ( वय ४६, रा. वांजळे, ता. खेड) याने राहत्या घरासमोर त्या खेळत असताना, चॉकलेट देतो, असे सांगून घरात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने घराला आतून कडी लावली आणि त्यांच्याशी अश्लील चाळे केले. त्यांच्यापैकी एका मुलीने ही घटना आपल्या आजीला सांगितली. आजी याबाबत त्याला जाब विचारायला गेली असता, उलट याबाबत मीच तुमच्यावर जातिवाचक शिवीगाळ केली म्हणून अ‍ॅट्रॉसिटी दाखल करून सर्र्वांंना आत टाकतो, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यानंतर मुलींचे कुटुंबीय चार दिवस गप्प राहिले. मात्र, काल त्यांच्यापैकी एक मुलगी फिर्यादी झाली आणि इतर दोन मुली आणि कुटुंबीयांसह खेड पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. आरोपी खंडे हा त्या गावाचा पोलीस पाटील आहे. या मुली वांजळे या गावातून डेहणे गावात शिक्षण घेण्यासाठी दररोज तीन किलोमीटर ये-जा करीत असतात. आरोपी यापूर्वीही आमच्या मागे येत होता, असे मुलींनी फिर्यादित म्हटले आहे.खेड पोलिसांनी, या फिर्यादीवरून आरोपी पोलीसपाटील गंगाराम खंडे याच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३५४(अ) (१) नुसार आणि बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८,१०,१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून, तो फरारी आहे. (वार्ताहर)