शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कर्वे रोडवर भरदिवसा सुरू झाली 'पॉर्न' फिल्म

By admin | Updated: August 27, 2016 12:02 IST

पुण्यात भरदिवसा, खचाखच भरलेल्या रस्त्यात मोठ्या स्क्रीनवर पॉर्न फिल्म लागल्याने ट्रॅफिक जॅम झाले.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - सभ्य, सुसंस्कृत , विद्याविभूषितांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात भरदिवसा, खचाखच भरलेल्या रस्त्यात मोठ्या स्क्रीनवर पॉर्न फिल्म लागल्याने वेगळीच चर्चा रंगली.  गेल्या आठवड्यात सोमवारी, पुण्यात कर्वे रोडवर डिजीटल होर्डिंगवर "पॉर्न व्हिडिओ‘ची वेबसाईट झळकल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. एका नेटिझनने या घटनेचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केल्याने ही अजब घटना समोर आली आहे.
 पुण्यातील कर्वे रोडवर नेहमीप्रमाणे गाड्यांची वर्दळ सुरु होती, गाडीवाले आणि पादचारी त्यातूनच वाट काढून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे वाहतुकीचा गोंधळ अजूनच वाढत होता. मात्र अचानक वाहतुकीचा वेग मंदावला. त्याच कारण म्हणजे तेथील इलेक्ट्रॉनिक जाहिरात बोर्डवरील लाल अक्षरं गायब झाली आणि तिथे पॉर्न फिल्मच्या छटा उमटल्या. 
जाहिरात फलकावर चक्क पॉर्न फिल्म लागल्याने सगळेच भांबावले, सुस्साट जाणा-या गाड्यांचे स्पीड अचानक कमी झाले आणि सर्वजण लपूनछपून त्या बोर्डावर नजर टाकू लागले. मात्र  वाहनांचा वेग अचानक मंदावल्याने कर्वे रोड मोठी वाहतूक कोंडी झाली. 
भररस्त्यात एवढ्या मोठ्या स्क्रीनवर पॉर्न फिल्म लागलीच कशी हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला, असं डिजीटल बोर्डाचे काम पाहणा-या व्यक्तीन सांगितलं. बोर्ड खराब झाल्यामुळे ऑनलाईन रिपेअरिंग सुरु असताना तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला, अशी सारवासारव करण्यात येत आहे.