शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील मेसेज पाठवणारा गजाआड

By admin | Updated: March 27, 2017 03:44 IST

शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून

पुणे : शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दीपककुमार प्यारेलाल गुप्ता (वय ४०, रा. घरकुल, शिवाजीनगर, जळगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. एन. गट यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोऱ्हे यांना आरोपीने २१ ते २७ फेब्रुवारीदरम्यान अश्लील आणि धमकीचे मेसेज पाठवले होते. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईचे सहआयुक्त देवेन भारती, पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी पुणे व मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. दरम्यान, आरोपीने आणखी काही महिला लोकप्रतिनिधींना अशाच प्रकारे मेसेज केल्याचे समोर आले होते. त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहामधून न्यायालयाकडून प्रोड्यूस वॉरंट घेऊन ताब्यात घेतले. त्याला अटअक करण्यात आली असून, रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मेसेजमागील उद्देश आणि त्यासाठी कोणी प्रवृत्त केले याचा तपास करायचा असून, सिमकार्ड जप्त करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची सरकारी वकील एस. जे. बागडे यांनी मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) व्ही. एच. दरेकर करीत आहेत.