पनवेल : अहमदनगर जिल्हय़ातील जवखेडे, खालसा येथे झालेल्या संजय जाधव, जयo्री जाधव, सुनील जाधव यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे मंगळवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विवेक पाटील यांनी या दुर्दैवी घटनेचा तीव शब्दात निषेध केला.
शाहू, फुले, आंबेडकर यांनी महाराष्ट्राला सामाजिक वारसा दिला. पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडणो हे निषेधार्ह आहे. आमच्यासारख्या पुरोगामी विचारांच्या कार्यकत्र्याना या घटना क्लेशदायक वाटत आहेत. या घटनेचा निषेध केवळ दलित संघटना करीत आहेत, परंतु सर्व जाती-धर्माच्या जनतेने अशा घटनांविरोधी भूमिका घेणो आवश्यक असल्याचे मत विवेक पाटील यांनी व्यक्त केले.
या हत्याकांडाच्या तपासात गती नाही, याबाबत विवेक पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाची भीती, जरब शिल्लक नसल्याने अशा घटना वाढत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नगर जिल्हा अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा, तसेच जलदगती न्यायालयात या हत्याकांडाचा तपास चालवून गुन्हेगारांना कठोरातील कठोर अशी शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी विवेक पाटील यांनी केली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयातून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाने काढलेल्या या मोर्चामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांनी उत्स्फूर्तपणो सहभाग घेतला. या मोर्चामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कर्नाळा सर्कल मार्गे, जय भारत नाका, नगरपालिका येथून पनवेल तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पनवेलचे नायब तहसीलदार म्हात्रे यांना यावेळी शेकापकडून निवेदन देण्यात आले.
या मोर्चामध्ये शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण घरत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील, माजी सभापती काशिनाथ पाटील, महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन व विकास महासंघाचे अध्यक्ष बा.रा.सदावर्ते यांच्यासह
शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठय़ा संख्येने यात सहभागी झाले होते. (वार्ताहर)
बौद्ध समाजाकडून निषेध
दासगांव : अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबाची क्रूर हत्या करण्यात आली. या हत्येचा महाड तालुक्यातील बौद्ध समाजातील विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करत हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक केली जावी, अशा मागणीचे निवेदन महाड प्रांताधिका:यांना सादर केले.
जाधव कुटुंबाची हत्या होवून आठ दिवस उलटून गेले तरी आरोपींचा शोध लावण्यास अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दलितमित्र मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक बैठक घेण्यात आली. महाडमधील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांनी, प्रतिनिधींनी या घटनेचा निषेध केला.
यावेळी महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे राज्यपालांना सादर करावयाचे निवेदनही दिले. याप्रसंगी मधुकर गायकवाड, मुकुंद पाटणो, सखाराम सकपाळ, विनायक हाटे, प्रभाकर खांबे, संतोष पवार, शंकर साळवी, केरु गायकवाड, मुकाराम माने, दीपक मोरे, कुंदन हाटे, अशोक मोरे, राजेंद्र निकम, भूपेंद्र सवादकर, महेंद्र शिर्के, विठोबा घाडगे आदि उपस्थित होते. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक व्हावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. (वार्ताहर)