शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत पाताळगंगा नदीच्या पाण्याला दुर्गंधी

By admin | Updated: June 29, 2016 02:34 IST

कुक्कुटपालन व्यावसायिकाने मृत पक्ष्यांचे पूर्ण शरीर व कटिंग केलेल्या पक्ष्यांचे पाय, डोके, पंख, पिसे असे अवयव पोत्यात भरून टाकल्याने ते सडले

वावोशी : हाळ गावाच्या हद्दीत खोपोली म्हाडा कॉलनीजवळील पाताळगंगा नदीपात्रात कुक्कुटपालन व्यावसायिकाने मृत पक्ष्यांचे पूर्ण शरीर व कटिंग केलेल्या पक्ष्यांचे पाय, डोके, पंख, पिसे असे अवयव पोत्यात भरून टाकल्याने ते सडले आहेत. यामुळे या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. असे अवयव नेहमीच या ठिकाणी टाकण्यात येत असल्याचा आरोप महड गावातील ग्रामस्थ करीत आहेत. गावामध्ये साथीची रोगराई पसरू नये म्हणून खालापूर नगरपंचायतीने याबाबत लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे. तर शिवसेना ग्राहक कक्ष तालुका संघटक किरण हडप यांनी लेखी पत्राद्वारे आरोग्य अधिकारी खालापूर यांना चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. महड गावाच्या पूर्व बाजूस हाळ गावाच्या हद्दीत व खोपोली नगरपालिकेच्या आदोशी स्मशानभूमीलगत मृत पक्ष्यांचे अवयव ट्रकभर सुमारे २०० पोती नदीपात्रात व परिसरच्या आडोशाला टाकल्याने दुर्गंधी पसरून रोगराई होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आदोशी, हाळ, महड व खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई, शिळगाव तसेच रमाधाम वृद्धाश्रम परिसरात येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी चार वर्षांपूर्वी अशाच मृत पक्ष्यांच्या अवयवाच्या गोणीमधील मांस खावून दोन हजारच्या आसपास कावळे मृत झाल्याची घटना घडली होती.खालापूर नगरपंचायतीने याबाबत चौकशी करून या गोणीमध्ये मृत कोंबड्यांचे अवयव सडक्या अवस्थेत असल्याचा निष्कर्ष काढत ही जागा खोपोली नगरपालिका हद्दीत असल्याचे सांगितले. तर हाळ ग्रामस्थांनी डोलवली गावाजवळ असणाऱ्या मोठ्या उद्योजकाच्या मालकीच्या पोल्ट्रीतील कोंबड्या असाव्यात अशी शंका व्यक्त केली.