शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ - कळंब रस्त्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 02:52 IST

कर्जत तालुक्यातील नेरळ -कळंब रस्त्यावर महिनाभरापूर्वी भरलेले खड्डे गायब झाले

नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ -कळंब रस्त्यावर महिनाभरापूर्वी भरलेले खड्डे गायब झाले असून पुन्हा रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन कसे चालवायचे, असा प्रश्न वाहनचालकांना पडला असून रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर बांधकाम विभाग लक्ष देणार का, असा प्रश्न वाहनचालक, प्रवासी व स्थानिकांनी उपस्थित केला आहे.कर्जत तालुक्यातील नेरळ -कळंब हा महत्त्वाचा रस्ता असून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वाहने ये-जा करत असतात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेशोत्सव काळात बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचे थातूरमातूर काम केल्यानेच पुन्हा रस्त्यांची अवस्था जैसे थे झाली आहे. महिन्याभरातच भरलेले खड्डे गायब झाल्याने वाहनचालक व प्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहन खराब होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. खड्डे चुकवताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्त्याच्या साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून ते झुकल्याने रस्ताही अरु ंद झाला आहे.तसेच आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन जोरात आपटून साचलेले पाणी वाहनचालकांच्या अंगावर उडते. याचा त्रास प्रवाशांना होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने यांची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा या रस्त्यावर अपघातात घडल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल अशा इशारा स्थानिक ांनी दिला आहे. गणेशोत्सवादरम्यान थातूरमातूर खड्डे भरल्याने पुन्हा रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी लवकर हा रस्ता चांगल्या दर्जाचा करावा, अन्यथा बांधकाम विभागाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मोरगे यांनीदिला आहे. (वार्ताहर)>खड्डे भरणारनेरळ-कळंब रस्त्यावर दोन वेळा खड्डे भरण्यात आले होते. जोरदार पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. रस्त्याची पाहणी करु न पुन्हा या रस्त्यावरील खड्डे भरण्यात येतील, असे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रशेखर सहनाल यांनी सांगितले.