शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल

By admin | Updated: March 1, 2017 00:35 IST

थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत

मोशी : थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. सालाबादप्रमाणे ‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माठाचे बाजारात आगमन झाले आहे. मात्र, माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने यंदा माठाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट राहणार आहेत. नाशिक रस्ता, मोशी व भोसरीमध्ये लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी आहे. होळीनंतर माठांची मागणी वाढणार असून, या बाजारात तेजी येईल, असा माठ व्यावसायिकांचा अंदाज आहे. (वार्ताहर)>व्यवसाय करणे अवघड माठ खरेदी करताना ग्राहक काहीही भाव करतात. सांगितलेल्या दरापेक्षा निम्म्या दरात माठ खरेदी करण्याची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. मात्र, पर्याय नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी हा पारंपरिक उद्योग आम्हाला करावाच लागत आहे. त्यातच आज- काल गरिबांच्या घरातही इलेक्ट्रॉनिक फ्रिज आढळून येतो. त्यामुळे साहजिकच आमच्या व्यवसायावर परिणाम होतो, अशी खंतही कुंभार बांधवांनी व्यक्त केली. >कच्च्या मालाच्या किमती दुप्पट सद्य:स्थितीत १५०० रुपये एक मातीचा ट्रॅक्टर, ४०० रुपये एका छोटा टेम्पोभर माती असे कच्च्या मालाचे दर आहेत. तयार केलेले माठ शेकण्यासाठी लागणारे लाकूड ७ ते ८ रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. माठ बनवण्यासाठी करावी लागणारी मेहनत व खर्च पाहता आता व्यावसायिक दृष्टिकोनातून माठ बनविणे आज परवडण्यासारखे नाही. यामुळेच माठांचे भाव दुपटीने वाढलेले आहेत. भोसरीमध्ये राजन कुंभार, श्रीहरी कुंभार, बाळा कुंभार, जयप्रकाश नाथ या व्यावसायिकांनी माठ विक्रीसाठी ठेवलेले आहेत. साधारणत: पौष महिन्यात (डिसेंबर, जानेवारी) या महिन्यात बनविलेल्या माठांमध्ये उन्हाळ्यात अत्यंत गार पाणी असते, असे व्यावसायिक सांगतात. >मार्च, एप्रिल व मे या तीनच महिन्यांत माठांचा हंगाम असतो. माठ बनविण्याचे साहित्य अत्यंत महाग झाले आहे. त्यामुळे माठ बनविणेही कठीण झाले आहे. मात्र, तरीही आम्ही ग्राहकांना परवडतील असेच दर ठेवलेले आहेत. ग्राहकांनीही भाव न करता सहकार्य करावे.- श्रीहरी कुंभार, माठ व्यावसायिक