शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही हात गमावूनही सोडली नाही हिंमत

By admin | Updated: March 8, 2016 01:04 IST

मूळ गाव कर्नाटक, परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करण्याकरिता पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झालेली सुनीता पवार ही २२ वर्षांची महिला. प्रबळ जिद्द हीच तिच्यासाठी जगण्याची आशा ठरली आहे.

पिंपरी : मूळ गाव कर्नाटक, परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करण्याकरिता पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झालेली सुनीता पवार ही २२ वर्षांची महिला. प्रबळ जिद्द हीच तिच्यासाठी जगण्याची आशा ठरली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सुनीताच्या जीवनप्रवासाची अनोखी कहाणी.एका बांधकाम व्यावसायिकाच्या साइटवर काम करताना वर्षापूर्वी विजेचा धक्का बसून झालेल्या अपघातात तिचे दोन्ही हात निकामी झाले. हात निकामी झालेल्या पत्नीचा उपयोग नाही, हे लक्षात येताच त्याच अवस्थेत तिला एकटीला सोडून पती निघून गेला. अपघातातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना तिची प्रसूती झाली. कन्यारत्न झाले. हात नसल्याने स्वत:ची कामे करण्यास येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत तिने बाळाचे संगोपन करण्याची जबाबदारी पेलली आहे. प्रबळ जिद्द हीच तिच्यासाठी जगण्याची आशा ठरली आहे.कर्नाटकातील एका छोट्या गावात जन्मलेली सुनीता जेमतेम चौथीपर्यंत शिकली. बालपणीच आई, वडिलांचा देहांत झाल्याने चुलते तसेच अन्य नातेवाइकांनी तिचे लग्न करून दिले. लग्नानंतर ती नवऱ्याबरोबर मोलमजुरीच्या कामासाठी दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडला आली. बांधकाम व्यावसायिकांकडे ती बिगारी, गवंड्यांच्या हाताखाली सिमेंट, वाळू, विटा देण्याचे काम करू लागली. मजुरीच्या कामातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांची गुजरान सुरू होती. पती-पत्नी दोघेही काम करत असल्याने त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू होता. एक वर्षापूर्वी बांधकाम साइटवर बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारताना तिला जोरात विजेचा झटका बसला. कोपराच्या खाली दोन्ही हात जळून खाक झाले. सहा महिन्यांहून अधिक काळ तिला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. बांधकाम व्यावसायिकाने रुग्णालयीन खर्चासाठी थोडी रक्कम देऊन या प्रकरणातून स्वत:ची सुटका करून घेतली. दोन्ही हात नसल्याने कायमचे अपंगत्व आलेल्या या महिलेवर एकापाठोपाठ एक संकटे ओढवली. या अवस्थेत सोडून पती निघून गेला. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले असल्याने १६ वर्षांचा छोटा भाऊच आधार ठरलेला. हात निकामी, त्यामुळे रोजची स्वत:ची कामे करण्यापासून ते स्वयंपाक बनविण्यापर्यंतची कामे करणे तिला अशक्य झाले असताना, कौटुंबिक खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची, हे संकट तिच्यापुढे निर्माण झाले. दिल्लीतील एका संस्थेच्या स्वयंसेवकांनी दोन्ही हात नसताना दैनंदिन कामे कशी करायची, याचे प्रशिक्षण दिले. हाताला पंजा, बोटे नसताना वस्तू पकडायची सवय झाली. (प्रतिनिधी)आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अशा अवस्थेतही तिची धडपड सुरू आहे. शासनाच्या योजनांचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी स्थानिक नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्याकडे तिचा पाठपुरावा सुरू आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर यांनी तिला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे तिला आता दरमहा ६०० रुपये मिळतात. तर स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी तिला पत्राशेड उभारण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. समाजातून तिला मदत मिळू लागली आहे. येणाऱ्या संकटाला धैर्याने तोंड देत तिचे जिद्दीने जीवन जगणे इतरांसाठी प्रेरणादायी ठरू लागले आहे. तिच्या जिद्द आणि चिकाटीचा आदर्श इतर महिलांनी घेऊन जीवनात प्रगती साधावी.