शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागात दारूबंदी करा : नाना

By admin | Updated: April 4, 2016 03:32 IST

दोन्ही पिकं गेली आहेत. पुढच्या दोन ते तीन महिन्यांचा काळ संवेदनशील आहे. पीक गेलेच आहे, आता पाणीही नाही. त्यामुळे दु:खात असताना आम्हाला (शेतकऱ्यांना) दारू जवळ करावीशी वाटते

मुंबई : दोन्ही पिकं गेली आहेत. पुढच्या दोन ते तीन महिन्यांचा काळ संवेदनशील आहे. पीक गेलेच आहे, आता पाणीही नाही. त्यामुळे दु:खात असताना आम्हाला (शेतकऱ्यांना) दारू जवळ करावीशी वाटते. त्या नशेत बैलाच्या गळ्यातला कासरा शेतकरी गळ्याला लावतो, हे होऊ द्यायचे नसेल तर मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात तीन महिन्यांसाठी दारूबंदी जाहीर करा. थोडा महसूल बुडेल. पण अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचतील, असे भावनिक आवाहन नानांनी केले तेव्हा अवघे सभागृह गदगदून गेले. अणेंना नानांचा टोला विदर्भ आणि मराठवाड्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेले माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांना नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणातून कोपरखळी मारली. ‘अणे, विदर्भ माझा, खान्देश माझा आणि बिहारसुद्धा माझाच आहे. तुमचे वक्तव्य चूक की बरोबर, गैर आहे की नाही याची मीमांसा मला करायची नाही. माझा एक हात-पाय तोडला तर मी जिवंत कसा राहू शकतो? आपण सगळ्यांनी एकत्र राहू या.’ नानांच्या या वाक्यावर सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ‘नानां’साठी सर्वाधिक मते : ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अ‍ॅवॉर्ड’ पुरस्कारासाठी ‘नटसम्राट’ चित्रपटासाठी नाना पाटेकर यांचे नामांकन होते. पुरस्कारासाठी आॅनलाइन मतदान होते. ८० नामांकनांमध्ये सर्वाधिक मते नानांना मिळाली.आमच्या पोलिसांना घरे कधी मिळतील, असा सवाल नानांनी मुख्यमंत्र्यांना केला तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, ‘नाना, तुम्ही माझ्या मनातील प्रश्न विचारलात, या वर्षी पोलिसांच्या २९ हजार घरांचे नियोजन केले आहे. पोलिसांना हक्काचे, कायमस्वरूपी घर मिळण्याकरिता जे विकासक पोलिसांना घरे देतील, त्यांना अधिक चटईक्षेत्र निर्देशांक देत असल्याचे स्पष्ट केले.’ यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.