शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

खवले मांजर नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या यादीत

By admin | Updated: February 20, 2016 02:21 IST

‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन आॅफ नेचरच्या रेड डाटा बुक’नुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आला आहे.

सचिन लुंगसे ,  मुंबई‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन आॅफ नेचरच्या रेड डाटा बुक’नुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आला आहे. या प्राण्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी रत्नागिरी वनविभाग सरसावला आहे. कोकणातील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी पोलिसांचीही याकामी मदत घेण्यात येत आहे.खवले मांजर कोकणात सर्वत्र आढळते. मांस, चिनी औषधे व बुलेट प्रुफ जॅकेटसाठी जगभर त्याची हत्या होत आहे. ही प्रजाती अत्यंत धोक्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात आढळणाऱ्या खवले मांजराला वाचवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत ग्रामपंचायत, पोलिस पाटील यांना मांजराच्या संरक्षणासाठी आवाहनाचे पत्र व पोस्टर पाठवण्यात येत आहे. संपूर्ण कोकणात त्याच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक खवले मांजर दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी २० फेब्रुवारी रोजी ‘जागतिक खवले मांजर दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने वन विभाग आणि सहयाद्री निसर्ग मित्र या संस्थेतर्फे खवले मांजर संरक्षण व संवर्धन यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.खवले असलेला एकमेव सस्तन प्राणीमुंगुसासारखा दिसणारा पण खवले असणारा हा प्राणी साधारणत: सर्व प्रकारच्या जंगलात आढळतो. फेलिडोटा कुटुंबातील हा प्राणी असून, तो निशाचर आहे. खवले मांजर हा खवले असणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. तो मांसाहरी वर्गातील असून वाळवी, मुंग्या व वारुळात राहणारे इतर जीव हे त्याचे मुख्य खाद्य असते. खवले मांजराला दात नसल्यामुळे ते खाण्यासाठी १० ते १२ इंच लांब जिभेचा उपयोग करते. खवले मांजर वर्षभरात ७० ते ८० कोटी ककडे वर्षभरात खाते आणि निसर्गचक्राचा तोल सांभाळते. खवले मांजरापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.मांजराचे वजन : ८ ते ३५ किलोपर्यंत भारतीय खवले मांजराची लांबी (डोके व धड) ६०-७५ सेंटीमीटर असते. शेपूट ४५ सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. भारतीय खवले मांजर साधारणत: ८ ते ३५ किलोपर्यंत वाढते. त्याच्या अंगावर असलेले खवले हे किराटीन नामक द्रव्यापासून तयार होतात. पाय, पोट, कपाळ असा काही भाग सोडल्यास संपूर्ण अंगभर हे खवले असतात. धोक्याची जाणीव होताच खवले मांजर स्वत:च्या शरीराचा गोल भाग करून घेते. यामुळे त्याचे शत्रूपासून संरक्षण होते.भारतात दोन प्रजाती खवले मांजराच्या अशिया खंडात चार आणि आफ्रिकेत चार अशा आठ प्रजाती सापडल्या आहेत. भारतीय खवले मांजर हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर, पाकिस्तान व श्रीलंकेत आढळते. तसेच पाकिस्तान, श्रीलंकेत आढळते, तर चिनी प्रजाती हिमालय, आसाम, नेपाळ, ब्रह्मदेश, दक्षिण चीनमध्ये आढळते.