कोल्हापूर, दि. १५ - शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिस-या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली.
गुरुवारी सकाळी अंबाबाईचा शासकीय अभिषेक करण्यात आला. दुपारच्या आरतीनंतर देवीची श्री धैर्यलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. अष्टलक्ष्मीतील तिसरी देवता म्हणजे श्री धैर्यलक्ष्मी. ही देवता भक्ताच्या मनातील भय-भीतीचा नाश करून त्याच्याठायी धैर्य, पराक्रम उत्पन्न करते. त्यानुसार भीतीचा नाश व शौर्य-पराक्रमासाठी या देवतेची उपासना करतात. ही पूजा दीपक कुलकर्णी, विवेक सरमुकद्दम, अरविंद कुलकर्णी, अलोक कुलकर्णी यांनी बांधली.