शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाच्या बागेचे सरपण!

By admin | Updated: May 8, 2016 02:23 IST

सरणवाडीतील ८४ एकरावर फुलविलेली डाळिंबाची बाग पाण्याअभावी पूर्णपणे सुकली असून तिचा उपयोग आता केवळ सरपणासाठीच होण्याची स्थिती आहे.

- संदीप अंकलकोटे, चाकूर (लातूर)

सरणवाडीतील ८४ एकरावर फुलविलेली डाळिंबाची बाग पाण्याअभावी पूर्णपणे सुकली असून तिचा उपयोग आता केवळ सरपणासाठीच होण्याची स्थिती आहे.चाकूर येथील उत्तमराव जाधव- पाटील यांनी सरणवाडीवरील डोंगराळ माळरानावर २०१०- ११ मध्ये ८४ एकरावर डाळिंबाची लागवड केली़ मोठ्या जिद्दीने आणि परिश्रमाने ही बाग फुलविली़ त्यासाठी त्यांनी एकरी ७० ते ७५ हजार रूपये खर्च केला. पहिल्या वर्षी त्यांना बागेतून १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले़ त्यामुळे त्यांनी आणखी ३० ते ३५ लाखांचा खर्च केला़ २०१३-१४ मध्ये डाळिंबाच्या बागेतून दीड कोटींचे उत्पन्न मिळाले़ दर्जा उत्कृष्ट असल्याने त्यांचे डाळिंब कोलकाता, बंगळुरू, नागपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी जात असत.बागेसाठी त्यांनी १८ बोअरही घेतले. मात्र त्यातील केवळ ७ बोअरला पाणी लागले़ त्यातून त्यांनी बाग जपली होती. परंतु, यंदा सर्वच बोअरचे पाणी आटल्याने बाग सुकली. पाण्याअभावी झाडे वाळत असल्याने विकतचे पाणी आणून बाग जगविण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. ३६ मजूर : बागेची जोपासणा करण्यासाठी दरवर्षी ३६ मजूर ठेवले जात असत़ तसेच ३६ महिला रोजंदारीवर काम करीत़ बाग वाळल्याने जाधव यांनी केशर आंबा, चिकू, आवळा, पपई या फळबागांतील काम या मजुरांना उपलब्ध करून दिले आहे़शासनाने फळबागेसाठी विमा संरक्षण दिले पाहिजे़ तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे.- उत्तमराव जाधव, शेतकरी