शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

प्रदूषण नियमावली एसटीकडून धाब्यावर?

By admin | Updated: March 29, 2017 03:21 IST

एसटी महामंडळाकडून प्रदूषण नियंत्रण नियमावली धाब्यावर बसवली की काय असाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. केंद्राच्या निकषाप्रमाणे

मुंबई : एसटी महामंडळाकडून प्रदूषण नियंत्रण नियमावली धाब्यावर बसवली की काय असाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. केंद्राच्या निकषाप्रमाणे युरो-४ नुसार बस दाखल करण्याऐवजी एसटी महामंडळाने युरो-३ प्रमाणे एसटीच्या ताफ्यात बस दाखल केल्या आहेत. स्कॅनिया कंपनीच्या असणाऱ्या या बसेस पर्यावरणस्नेही नसल्याची बाब समोर आल्याने या बस घेण्यामागील नेमके कारण काय असा सवाल उपस्थित होत असून महामंडळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महत्वाची बाब म्हणजे एसटी महामंडळात व्होल्वो विरुद्ध स्कॅनिया असे छुपे युद्धच सुरु झाले आहे. एसटी महामंडळाने सध्या व्होल्वो ऐवजी स्कॅनिया कंपनीला बसची आॅर्डर दिली आहे. त्यात ५0 बसमध्ये १५ मल्टिअ‍ॅक्सेल बसचा समावेश आहे. परंतु या बसेस केंद्राच्या निकषानुसार नसल्याचे सांगण्यात येते. व्होल्वो कंपनीकडून युरो-४ नुसार बसेस बनविल्या गेलेल्या असतानाच एसटी महामंडळाकडून व्होल्वोऐवजी स्कॅनिया कंपनीलाच पसंती देण्यात आली आहे. स्कॅनियाकडून बी एस ३ प्रकारातील बस महामंडळाला देण्यात येणार असून व्होल्वोकडून बी एस ४ अशी स्वस्त व पर्यावरणस्नेही बस देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती, तरीही महामंडळाने स्कॅनियालाच निवडले. त्यामुळे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी या उलाढाली करण्यात आल्या आहेत की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले, युरो ४ हे एप्रिल महिन्यापासून लागू होत आहे. यापुढे नवीन बसेस घेताना युरो-४ मधील बस घेतल्या जातील,असे सांगितले, घेण्यात आलेल्या बसेस या भाडे तत्वावरील आहेत. (प्रतिनिधी)महत्वाचे म्हणजे व्होल्वो बी-८ आर.बी.एस ४ ची किंमत ही ९८ लाख असून स्कॅनियाच्या मेट्रो लिंक बी.एस. ३ ची किंमत ही १ कोटीपेक्षा जास्त आहे. तर व्होल्वोच्या बी ११ आरची किंमत १ कोटी ३0 लाख असून स्कॅनियाच्या बसची किंमत पाच लाखांनी जास्त आहे.