शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चार कारखान्यांना प्रदूषण मंडळाचा दणका

By admin | Updated: August 4, 2016 02:45 IST

सांडपाणी केंद्रात योग्य प्रक्रिया केली जात नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबरनाथमधील ४६ कारखान्यांच्या सांडपाणी सोडण्यावर बंदी घातली होती.

कल्याण : सांडपाणी केंद्रात योग्य प्रक्रिया केली जात नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबरनाथमधील ४६ कारखान्यांच्या सांडपाणी सोडण्यावर बंदी घातली होती. त्यानंतरही चोरून सांडपाणी सोडणाऱ्या चार कारखान्यांना प्रदूषण मंडळाने दणका दिला असून त्यांचे पाणी बंद करण्याची नोटीस बजावली आहे. सांडपाण्याबाबतची ही नोटीस २ जुलैला बजावली होती. त्यात डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ कारखान्यांचा समावेश त्यात होता. कारखाने बंद करा, अशी नोटीस मंडळाने बजावली नव्हती; तर कारखान्यातून रासायनिक सांडपाणी प्रक्रियेसाठी सांडपाणी सोडू नका, असे त्यात म्हटले होते. सांडपाणी बंद केल्याने उत्पादन प्रक्रियाच ठप्प झाली. पण नोटीस बजावल्यावरही काही कारखान्यांनी त्यांचे सांडपाणी बंद केले नाही. ते छुप्या पद्धतीने सांडपाणी सोडत असल्याच्या तक्रारी प्रदूषण मंडळाकडे आल्या. त्यांनी पाहणी केली असता चार कारखाने दोषी आढळले. गोदरेज, डिफाईन्स, ज्युबिलन्ट आणि सीमेक्स या कारखान्यांतून सांडपाणी सोडले जात होते. नोटीस देऊनही सांडपाणी सोडणे बंद न केल्याने या कारखान्यांचा पाणी पुरवठाच बंद करण्याची नोटीस प्रदूषण मंडळाने एमआयडीसीला दिली आहे.