शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसमित्रांची घेतली जाणार हजेरी

By admin | Updated: March 27, 2016 01:24 IST

राज्यात सर्वत्र ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना राबवली गेल्याने पोलीस दलाच्या मदतीसाठी हजारो स्थानिक पोलीसमित्र म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी घेतलेली जबाबदारी ते पार पाडतात की नाही

- पंकज रोडेकर,  ठाणेराज्यात सर्वत्र ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना राबवली गेल्याने पोलीस दलाच्या मदतीसाठी हजारो स्थानिक पोलीसमित्र म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी घेतलेली जबाबदारी ते पार पाडतात की नाही, यासाठी त्यांची हजेरी घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे वारंवार दांडी मारणाऱ्या पोलीसमित्रांच्या जागी नवीन पोलीसमित्र नेमण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.पोलीसमित्र ही संकल्पना राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची आहे. पोलीस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी ती संकल्पना राज्यातील पोलीस दलांना राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे २०० पोलीसमित्र असावेत, असे सांगण्यात आले. त्यानुसार, शहर आणि ग्रामीण पोलीस दलात अशा प्रकारे हजारो तरुण पोलीसमित्र होण्यासाठी पुढे आले आहेत. हे पोलीसमित्र पोलिसांना त्यांच्या दैनंदित कामात त्यांच्या वेळेनुसार मदत करणार आहेत. यामध्ये पेट्रोलिंग, नाकाबंदी आणि गोपनीय माहिती देणे आदी मदतकार्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे आहेत. एका परिमंडळात सहा ते सात पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीसमित्र म्हणून पुढे आलेल्या प्रत्येक पोलीसमित्राने पोलिसांच्या मदतीसाठी दिवस आणि वेळ ठरवून दिलेली आहे. मात्र, त्याने घेतलेली जबाबदारी तो पार न पाडता वारंवार दांडी मारून फक्त पोलीसमित्र म्हणून मिरवणार असेल, तर त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे. पोलीसमित्रांची भरली होती शाळागेल्या शनिवारी शहर आयुक्तालयाच्या आवारात पोलीसमित्रांची शाळा भरली होती. निमित्त होते, ते राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे ठाणेभेटीचे आणि आढावा बैठकीचे. या वेळी प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन महिला आणि दोन पुरुष पोलीसमित्रांना बोलवण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी तब्बल ३५० पोलीसमित्रांनी हजेरी लावली. या वेळी दीक्षितांनी त्यांच्या अडचणी आणि अनुभव जाणून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले.