शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
4
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
5
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
6
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
7
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
8
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
11
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
12
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
13
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
14
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
15
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
16
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
17
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
18
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
19
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
20
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

निवडणुकीच्या वादातून दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: March 2, 2017 01:54 IST

ओळकाईवाडी, कुसगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांत मंगळवारी रात्री ११:३० वाजता हाणामारी झाली.

लोणावळा : ओळकाईवाडी, कुसगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांत मंगळवारी रात्री ११:३० वाजता हाणामारी झाली. यामध्ये शिवसेनेच्या ठोंबरे गटाने केलेल्या मारहाणीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांचे पुतणे व तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक नितीन रतन साळवे (वय ३४) व कुसगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीण रतन साळवे (वय ३१, रा. कुसगाव, लोणावळा) हे जखमी झाले. साळवे गटाच्या मारहाणीत शिवसेनेचे अतिष राजू केदारी (वय २३, रा. कुसगाववाडी, लोणावळा) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांकडून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.नितीन रतन साळवे यांच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेचे कुसगाव ग्रामपंचायत सदस्य गबळू ठोंबरे, रवी घोंगे, किसन ठोंबरे, बाळू काळे, अमोल ठोंबरे, बाळा ठोंबरे, अजित केदारी, मनोज केदारी, विजय घोंगे व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .पंचायत समितीच्या निवडणुकीत कुसगाव गावातून शिवसेनेच्या वतीने उषा संजय घोंगे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजश्री संतोष राऊत उमेदवार होत्या. निवडणुकीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे हे प्रचारप्रमुख होते. निवडणुकीत राऊत विजयी झाल्या व शिवसेनेच्या उमेदवार पराभूत झाल्या. हा राग मनात धरून मंगळवारी रात्री शिवसेनेचे रवी घोंगे व गबळू ठोंबरे हे रमेश साळवे यांच्या सोबत ओळकाईवाडी चौकात वाद घालत होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही माहिती मिळताच साळवे यांचे पुतणे नितीन व प्रवीण हे चौकात आले असता ठोंबरे यांनी तलवारीने नितीन यांच्या डोक्यात वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. इतर आरोपींनी काठ्या, चाकूने प्रवीणला मारहाण केली. या वेळी रमेश यांना गाडीत बसविले असता, आरोपींनी गाडीवर मागासवर्गीय जातीचे म्हणून शिवीगाळ करत हल्ला केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.विरोधी गटाचे अतिष राजू केदारी (वय २३, रा. कुसगावाडी) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, नितीन साळवे, प्रवीण साळवे, किरण साळवे व एक अनोळखी इसम यांच्यावर भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या वादातून साळवे यांनी हातातील दांडके व हत्यारांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.स्वाभिमानी रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष व बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक बरकत मुजावर यांची भेट घेत घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याची व रमेश साळवे यांना संरक्षण देण्याची मागणी केली. शिवसेनेच्या वतीने देखील जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत तपास अधिकारी व अप्पर अधीक्षक यांची भेट घेण्यात आली. (वार्ताहर)>तणाव : पोलीस अप्पर अधीक्षकांनी दिली भेटघटनेची माहिती मिळताच कुसगावात व परिसरात निर्माण झालेले तणावाचे वातावरण पाहता पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक बरकत मुजावर, उपविभागीय अधिकारी अजित शिंदे, ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक राम जाधव, शहरचे निरीक्षक चंद्रकांत जाधव, कामशेतचे निरीक्षक आय.एस.पाटील, लोणावळा ग्रामीणचे सहायक निरीक्षक संदीप येडे पाटील, वडगावचे उपनिरीक्षक लोणीकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी तीन जणांना एलसीबीने ताब्यात घेतले असल्याचे तपास अधिकारी मुजावर यांनी सांगितले.