शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मतदान

By admin | Updated: February 22, 2017 14:21 IST

मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मतदान

मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मतदान अमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. परिसरातील काही केंद्रांना पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मुस्लिम परिसरातील मतदानकेंद्रांवर मतदानासाठी यंदा महिलांची गर्दी सुद्धा लक्षणीय ठरली.मंगळवारी सकाळी ७.३० पासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी ८ ते १० दरम्यान मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर बऱ्यापैकी गर्दी होती. मात्र ११ ते १ दरम्यान ही गर्दी ओसरली. पुन्हा २ वाजतानंतर गर्दी बघावयास मिळाली. महापालिका, पोलीस प्रशासन दप्तरी संवेदनशिल आणि अतिसंवेदनशील अशी नोंद असणाऱ्या मतदानकेंद्रांवर सोमवारी रात्रीपासूनच राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. मुस्लिम व हिंदू वस्त्यांच्या सीमेवरील मतदानकेंद्रांना प्रशासनाने लक्ष्य केले होते. मुस्लिमबहुल भागात जमील कॉलनी, छायानगर व अलिमनगर यातीन प्रभागात १२ जागांसाठी एकूण ...मुस्लिम सदस्य रिंगणात आहेत. या भागात सहा मतदानकेंद्र संवेदनशिल असून यात जमील कॉलनीस्थित महापालिका शाळा, गवळीपुरा येथील अ‍ॅकेडेमिक हायस्कूल, शासकीय विद्यानिकेतन, रतनगंज येथील हिंदी प्राथमिक शाळा, असोसिएशन बॉईज हायस्कूल व अल्लामा इंग्लिश स्कूलचा समावेश आहे. पोलीस प्रशासनाने शेख जफर विरुद्ध सोहेल बारी, आसिफ तव्वकल विरुद्ध गफफार राराणी, अहमद पत्रकार, अब्दुल रफिक व एजाज पहेलवान यांच्यातील लढत तर इमरान अशरफी विरुद्ध अफजल हुसेन या तुल्यबळ उमेदवारांच्या लढतीकडे लक्ष ठेऊन होते. मतदारांना आमिष दाखविल्याप्रकरणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. जमील कॉलनी महापालिका शाळेच्या बाहेर दुपारी काही उमेदवारांचे समर्थक समोरासमोर आले होते. पण, पोलीस पोहोचताच कोणीही दिसून आले नाही. यापरिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पार्टी, बसपा, युवा स्वाभिमान पार्टी, मुस्लिम लिग, राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये जोर दिसून आला. सायंकाळी ४ वाजेनंतर मतदानकेंद्रांवर एकच गर्दी उसळली होती. परिसरात स्थिती नियंत्रणात ठेवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. मुस्लिम भागातील मतदार यादीत त्रुटी ४मुस्लिमबहुल भागातील तीन प्रभागातील मतदारयादीत प्रचंड त्रुटी असल्याची ओरड मतदारांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. झोननिहाय मतदारयादी तयार करताना एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात जोडताना अनेक नावे भलत्याच प्रभागात गेल्याचे दिसून आले. व्हॉट्सअप किंवा महापालिका वेबसाईटवरही मतदारयादी सदोष असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. मतदारयादीत त्रुटी असल्याने मुस्लिमबहुल भागातील मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याचा आरोप अब्दुल रफिक, सलिम खान यांनी केला आहे.