शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी रोखण्यासाठी पुण्यातून उमेदवारी

By admin | Updated: November 2, 2016 01:27 IST

विधान परिषद निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधून इच्छुकांची संख्या अधिक होती.

पिंपरी : विधान परिषद निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधून इच्छुकांची संख्या अधिक होती. राष्ट्रवादीकडून कोणत्याही एका इच्छुकाला उमेदवारी दिली, तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. ही बंडखोरी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवडऐवजी विधान परिषदेची उमेदवारी पुन्हा पुण्यातील अनिल भोसले यांना जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर आहे.पुणे विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रवादीतून इच्छुकांची संख्या वाढली होती. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी व गटबाजीचा फटका बसल्याने भोसरीचे आमदार विलास लांडे यांचा पराभव झाला होता. महापौर निवडीतही लांडे गटाला डावलले होते. त्यामुळे नाराज लांडे भाजपाच्या वाटेवर असल्याची दोन वर्षांपासून चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याविषयी बोलले जात होते. शिवाय परिषदेवर पिंपरी-चिंचवडमधील कोणत्याही एका इच्छुकास संधी दिल्यास पक्षाची ताकद वाढले, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. दरम्यानच्या काळात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे लांडगेंच्या विरोधात लांडे यांना पक्षातून ताकद दिली जाईल, असा अदांज राजकीय वर्तुळातून होता. तसेच राष्ट्रवादीकडून माजी महापौर आझम पानसरे व योगेश बहल यांच्या नावाचीही चर्चा होती.शिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनाही राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी राजकीय समीकरणे मांडली जात होती. त्यामुळे विधान परिषदेसाठी लांडे, भोईर, पानसरे व बहल यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता होती. त्यासाठी प्रत्येकाकडून पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू होती. यापैकी कोणा एकाला उमेदवारी दिली, तर दुसरा गट नाराज होण्याची शक्यता होती. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा अनिल भोसले यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली. आता पिंपरी-चिंचवडला स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (प्रतिनिधी)