शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३१ आॅगस्टपर्यंत मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 02:17 IST

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण मोहीम-२०१६ ही देशभरात राबविण्यात येणार आहे.

अलिबाग : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण मोहीम-२०१६ ही देशभरात राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात देखील ती ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत मतदार यादीचे शुध्दीकरण करण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शीतल तेली-उगले यांनी मंगळवारी दिली आहे.जिल्हाधिकारी तेली-उगले म्हणाल्या, या मोहिमेमध्ये नवीन मतदारांची नावनोंदणी करणे, स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे व नवीन मतदार संघात त्यांची नोंदणी करणे तसेच मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. मतदार याद्यांचे शुध्दीकरण करताना स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यासाठी विवाह नोंदवही, मृत मतदारांची नावे वगळण्याकरिता मृत्यू नोंदवही याची तपासणी करु न कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील माहिती पोलीस दलाकडून घेण्यात येणार आहे. स्थलांतरित मतदाराचे नाव वगळण्यासाठी संबंधितांना संधी देऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणारे नागरिक मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकतात. नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी महाविद्यालयाच्या ठिकाणी शिबिर भरविण्यात येणार आहेत व सर्व अर्ज त्याच ठिकाणी भरु न घेण्यात येणार आहेत. मागच्या वर्षी ५४ हजार नवीन मतदारांची नावनोंदणी झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. आगामी काळात येणाऱ्या ग्रामीण आणि नागरी भागातील निवडणुकांमध्ये या मतदार यादीचा वापर करण्यात येणार आहे.पात्र मतदारांची मतदार यादीत नोंदणी करणे, मृत, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करणे आदी सर्व माहितीसह अद्ययावत व बिनचूक मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. >२० लाख ४० हजार ३४६ मतदाररायगड जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदार संघ असून एकूण मतदान केंद्रे २ हजार ४९३ आहेत. मतदार एकूण २० लाख ४० हजार ३४६ असून त्यामध्ये पुरु ष मतदार १० लाख ४२ हजार ९७९ तर स्त्री मतदार ९ लाख ९७ हजार ३६७ आहेत. मतदार यादीत ९३.६५ टक्के मतदारांचे फोटो आहे. मतदार ओळखपत्र टक्केवारी ९४.७९ आहे. नवीन मतदान केंद्र करावयाचे झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या जागा शोधण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून ३१ आॅगस्टनंतर या मतदार याद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.