शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेसाठी ३ फेब्रुवारीला मतदान

By admin | Updated: January 5, 2017 04:25 IST

महाराष्ट्र विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघांतून तीन व पदवीधर मतदारसंघांतून दोन सदस्य निवडून देण्यासाठी येत्या ३ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघांतून तीन व पदवीधर मतदारसंघांतून दोन सदस्य निवडून देण्यासाठी येत्या ३ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.विक्रम वसंतराव काळे (औरंगाबाद, शिक्षक), नागो पुंडलिक गाणार (नागपूर, शिक्षक), रामनाथ दादा मोते (कोकण, शिक्षक), रणजीत विठ्ठलराव पाटील (अमरावती, पदवीधर) आणि सुधीर भास्कर तांबे (नाशिक, पदवीधर) हे सदस्य सहा वर्षांची मुदत संपून ५ डिसेंबर रोजी निवृत्त झाल्याने ही निवडणूक होत आहे. यापैकी भाजपाचे रणजित पाटील हे गृह राज्यमंत्री असल्याने मंत्रीपद टिकविण्यासाठी त्यांना पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे. खरे तर ही व्दैवार्षिक निवडणूक विद्यमान सदस्यांची मुदत संपण्याआधीच व्हायला हवी होती. परंतु पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने त्या याआधी घेता आल्या नाहीत. सुधारित मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरु असून ७ जानेवारी रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक प्रक्रिया सुरु होईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या निवडणुका विभागीय पातळीवर होणार असून त्या त्या विभागांमधील जिल्ह्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता लगेच लागू झाल्याचेही आयोगाने स्पष्ट केले. १० जानेवारी-अधिसूचना प्रसिद्धी१७ जानेवारी- उमेदवारी अर्जांसाठी अंतिम मुदत१८ जानेवारी-उमेदवारी अर्जांची छाननी२० जानेवारी- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत३ फेब्रुवारी- मतदान (स. ८ ते सा. ४)६ फेब्रुवारी-मतमोजणी व निकाल