शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींविरोधात सत्ताधाऱ्यांचे ‘तक्रारास्त्र’

By admin | Updated: December 23, 2015 23:37 IST

विधानपरिषदेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रगीताविना सभागृह संस्थगित करण्याचा प्रकार घडला. यामुळे झालेल्या ‘न भुतो न भविष्यति’

योगेश पांडे,  नागपूरविधानपरिषदेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रगीताविना सभागृह संस्थगित करण्याचा प्रकार घडला. यामुळे झालेल्या ‘न भुतो न भविष्यति’ गोंधळामुळे विधानपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एकदा संस्थगित झालेले सभागृह परत सुरू झाले. या प्रकाराबाबत सत्ताधाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सभापतींकडून संपूर्ण अधिवेशनात आमच्यावर अन्याय करण्यात आला असा आरोप करत त्यांच्याविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार करण्यात येईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीदेखील स्पष्ट केले. वेळ पडली तर पुढे अविश्वास प्रस्तावदेखील आणण्याबाबत विचार करू असा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर नियम २६० अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उभे झाले. परंतु विरोधकांनी सभागृहात गोंधळ सुरू केला. मुख्यमंत्री बोलत असतानाच तालिका सभापतींनी कामकाज स्थगित केले. यावरून सत्ताधारी बाकांवरील सदस्य संतप्त झाले. हे सभागृहाच्या नियमाविरुद्ध असल्याची भूमिका त्यांनी मांडली. यानंतर सभागृहात सातत्याने गोंधळ सुरूच होता व दुपारपर्यंत सभागृहाचे कामकाज चक्क सातवेळा स्थगित करण्यात आले.दुपारी परत कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर नाईक यांनी गोंधळातच कामकाज सुरू केले. सभागृहाचे नेते एकनाथ खडसे हे उत्तर देत असतानाच परत सभापतींनी त्यांना थांबविले व निवेदन पटलावर ठेवण्याची सूचना केली. यावर सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच राष्ट्रगीताचा पुकारा न करताच त्यांनी सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत संस्थगित केल्याची घोषणा केली व ते सभागृहाबाहेर निघून गेले.यासंदर्भात सत्ताधारी पक्षांकडून सभापतींच्या दालनासमोर गोंधळ करण्यात आला. यानंतर सभागृह परत सुरू झाले. मी नियमानुसार सभागृह संस्थगित केले नाही, तर गोंधळ शांत करण्यासाठी केले. ९ मार्चची तारीख चुकून माझ्या तोंडून निघून गेली, असे सभापतींनी प्रतिपादन केले. यानंतर परत गोंधळ सुरू झाला. अखेर सभापतींनी राष्ट्रगीताचा पुकारा केला व सभागृहाची बैठक पुढील अधिवेशनापर्यंत संस्थगित केली. अशाप्रकारे एकाच सभागृहाची बैठक एकाच दिवसात दोन वेळा संस्थगित करण्यात आली.सभापती कक्षासमोर ‘संतापनाट्य’राष्ट्रगीताचा पुकार न करताच सभागृहाचे कामकाज संस्थगित केल्यामुळे सत्ताधारी प्रचंड संतप्त झाले. सभापतींच्या कक्षाबाहेरच मंत्री व सदस्यांनी राष्ट्रगीत म्हणण्याची तयारी सुरू केली. यात महसूलमंत्री एकनाथ खडसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते हे आघाडीवर होते. जर असे झाले तर यामुळे आणखी गोंधळ होऊ शकतो ही बाब लक्षात आल्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व सुनील तटकरे यांनी सर्व सत्ताधाऱ्यांना आत चलण्याची विनंती केली. परंतु सभागृह संस्थगित झाल्यानंतर आता परत कसे जाणार असा प्रश्न तावडे यांनी उपस्थित केला. अखेर सर्व जण सभापतींच्या दालनात गेले.बेकायदेशीर कामकाजसभापतींनी सभागृहात नियमांचे पालन केलेल नाही. मुख्यमंत्री आले नसताना सभापतींनी राष्ट्रगीत न घेता सभागृहाची बैठक संस्थगित करणे योग्य नाही. विरोधकांपुढे झुकून त्यांनी हे केले. परंतु सभागृह व नियमांसमोर कोणीही मोठे नाही.-गिरीश बापट, संसदीय कार्यमंत्रीसभापतींविरोधात अविश्वास प्रस्तावाचा विचारसभापतींनी सभागृहाच्या प्रथा-परंपरा नियम पाळलेले नाहीत. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अन्याय केला आहे. एकदा संस्थगित केलेले कामकाज त्याच दिवशी सुरू करता येत नाही. जर कामकाज सुरू करायचे असेल तर राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते. त्यांची राज्यपालांकडे तक्रार करणार आहोतच. परंतु वेळ पडली तर अविश्वास प्रस्तावदेखील आणू. -एकनाथ खडसे, महसूल मंत्री