शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

‘राजकारणात या, पण आधी पोस्टर चिकटवा!’

By admin | Updated: October 17, 2016 03:57 IST

राजकारणात यायचे असेल तर खुशाल या, पण आधी सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रचाराचे पोस्टर चिकटवण्याची तयारी ठेवा, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेत्यांना सल्ला दिला.

नागपूर : आज राजकारणात सर्वत्र घराणेशाही जोपासली जातेय, परंतु मी माझ्या मुलांना सांगितले आहे, तुम्हाला राजकारणात यायचे असेल तर खुशाल या, पण आधी सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रचाराचे पोस्टर चिकटवण्याची तयारी ठेवा, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेत्यांना सल्ला दिला.सप्तक व छाया दीक्षित वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी यांनी पत्नी कांचन यांच्यासह त्यांच्या समंजस व विश्वासू सहजीवनाचे विविध पैलू उलगडले.या वेळी गडकरी म्हणाले, ‘मी पक्षाला सांगितले आहे, आता यापुढे कधीही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. मला खासदारकी, मंत्रिपदच काय, तर राजकारणही सोडावे लागले तर सोडून देईल. हे पद मला मिळू नये, म्हणून जे राजकारण खेळले गेले, त्याने मला फार वेदना दिली,’ अशी खंतही गडकरी यांनी पहिल्यांंदा जाहीररीत्या व्यक्त केली. (प्रतिनिधी)कांचननेच सावरला संसारमी अगदी कमी वयातच समाजकारण, राजकारणाचे व्रत स्वीकारले होते. पाय कधीच जागेवर नसायचा. कांचनला याची पूर्ण जाणीव होती. एमएसस्सी फर्स्ट क्लास झालेली ही मुलगी. लग्नानंतर काय वाट्याला येईल, हे तिला स्पष्ट दिसत होते. तरीही तिने मला साथ देण्याचा निर्णय घेतला. पुढे आमदार, मंत्री झाल्यावर आयुष्य आणखी व्यस्त होत गेले. पहिला मुलगा झाला तेव्हा सर्व त्याला पाहून गेले. मी प्रचारात होतो. रात्री १० नंतर सर्वाच्या शेवटी मी निखिलला कुशीत घेतले. पण, कांचनने कधी कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही. २५ कप चहा बनवून ती किचन बाहेर येते न येते तोच मी पुन्हा तिला ५० कप चहाची आॅर्डर सोडायचो. तिने कधी नाक मुरडल्याचे मला आठवत नाही. कांचन सोबत होती म्हणूनच मी निश्चिंत होऊन हा राजकीय प्रवास करू शकलो, अशा शब्दात गडकरींनी पत्नी कांचन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजकारणात सर्वच अतृप्त आत्मेमी मागे अच्छे दिन कधीच येत नाही, असे बोललो तर नॅशनल मीडियाने मला टार्गेट केले़ पण, हे खरे आहे़ माणसांच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत़ राजकारणात तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते़ येथे सर्वच अतृप्त आत्मे आहेत़ जो नगरसेवक आहे त्याला आमदारकीचे तिकीट हवे असते. आमदाराला मंत्रिपदाचे स्वप्न पडते व मंत्री बनला त्याला थेट मुख्यमंत्रीच व्हायचे असते, याकडेही गडकरींनी मिश्कील हास्य ओठांवर आणीत श्रोत्यांचे लक्ष वेधले़