शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपात फूट पाडण्याचे राजकारण!

By admin | Updated: May 18, 2017 00:37 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे, ते पाहता मुख्यमंत्र्यांनी धुळे येथे जाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला हवे होते, असे सांगत

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे, ते पाहता मुख्यमंत्र्यांनी धुळे येथे जाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला हवे होते, असे सांगत देशात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जात असताना मुख्यमंत्री संपात फूट पाडण्याचे राजकारण करीत असल्याचा हल्लाबोल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केला. शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकला शेतकरी अधिवेशन होणार असून त्यात संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असून शेतकरी कर्जमुक्त व्हावा, हीच शिवसेनेची मागणी आहे. सत्तेत असलो तरी शिवसेना सध्या मागणाऱ्याच्या भूमिकेत असल्याने शेतकऱ्यांना देणाऱ्याच्या भूमिकेत फक्त मुख्यमंत्री व वित्तमंत्री असल्याची टीका त्यांनी केली. बुधवारी सुभाष देसाई व खा. संजय राऊत यांनी शुक्रवारच्या अधिवेशनाचा आढावा घेतला. शिवसेनेने मराठवाडा, विदर्भ, अकोला यांसारख्या भागांमध्ये केलेल्या पाहणीत व घेतलेल्या भेटीत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, तर शासनाच्या योजनादेखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसल्याचे आढळून आले. शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने दक्षता पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मी कर्जमुक्त होणारच, गर्जतो शेतकरी’ असा नारा घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली आहे, असे ते म्हणाले.पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा लाँगमार्चसत्तेत असलो तरी आमच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासारखे काहीच नाही म्हणून ते मिळविण्यासाठीच शिवसेना लढ्यात उतरली आहे. शेतकरी कर्जमुक्ती झाली नाही तर पावसाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचा भव्य लॉँगमार्च काढण्यात येईल व ‘आर-पार’ची लढाई लढण्यात येईल, अशी घोषणाही देसाई व राऊत यांनी केली.