शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राज यांना भोवले दुटप्पी राजकारण

By admin | Updated: October 21, 2014 03:39 IST

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे. १३ आमदारांवरुन त्यांची संख्या एका आमदारावर आली.२००९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची मते मिळवून १३ आमदार निवडून आणणाऱ्या राज यांची राजकीय वाटचाल दमदार असेल, असे भाकित वर्तविले होते, पण राज यांनी उलटसुलट भूमिका घेत त्यांनी स्वत:बरोबर पक्षालाही चक्रव्युहात टाकले. मोदींबाबतच्या उलटसुलट विधानांनी युवावर्ग त्यांच्यापासून दूर गेला. उच्च मध्यमवर्गीय मराठी माणूसही सध्या मोदींच्या प्रभावाखाली आहे. राज यांच्या ब्ल्यू प्रिंटचे या वर्गाला आकर्षण वाटेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्रात व राज्यात मोदी सरकार द्या हे पंतप्रधानांचे आवाहन अधिक प्रभावी ठरल्याने या वर्गाने मनसेच्या ब्ल्यू प्रिंटकडे पाठ फिरवली. मुंबईतील किमान १० विधानसभा मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय मतदारांनी भाजपाला एकगठ्ठा मतदान केले आहे. मनसेने पक्ष स्थापनेच्या वेळी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेऊन मारहाण केली होती. त्या वर्गाला मोदींचा पर्याय समोर दिसल्यावर त्यांनी मनसेच्या दबावाला झुगारून मतदान केले आहे. घाटकोपर (प.) व मुलुंड या दोन मतदारसंघात मराठी मतदारांचा टक्का हा अमराठी लोकांपेक्षा अधिक आहे. त्या मतदारसंघांतही भाजपाने विजय मिळवला याचा अर्थ मनसेने मराठी माणसांची घोर निराशा झाली आहे.राज यांच्या भूमिकांत व वर्तनात सातत्य नसल्याने त्यांची विश्वासार्हता लयाला गेली आहे, असे जाणकारांचे मत आहे. राज यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात ती बाहेर येण्यास नऊ वर्षे लागली. तोपर्यंत नाशिक महापालिकेत त्यांना सत्ता मिळाली, पण तेथेही त्यांनी प्रभावी काम करून दाखवता आले नाही. शिवसेना-भाजपा युती तुटण्याच्या मुहूर्तावर ब्ल्यू प्रिंटचे प्रकाशन झाल्याने लोकांपर्यंत ती पोहोचली नाही. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्याबाबतही टोकाची भाषा राज यांनी केली होती. नाशिकमध्ये भाजपाने पाठिंबा काढल्यावर राज यांनी थेट त्याच भुजबळ यांच्याशी हातमिळवणी केली. राज अशा कोलांटउड्यांमुळे त्यांचा पक्ष गटांगळ्या खात राहिला. (प्रतिनिधी)