शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात मी अनेकांना नाड्या बांधायला शिकवले!

By admin | Updated: May 20, 2017 00:47 IST

राजकारणात आपण अनेकांना नाड्या बांधायला शिकविले. तेच आज बोलत आहेत. आपणास कर्तृत्व सांगायची गरज नाही, असा पलटवार बुधवारी माजी मंत्री एकनाथ खडसे

- लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : राजकारणात आपण अनेकांना नाड्या बांधायला शिकविले. तेच आज बोलत आहेत. आपणास कर्तृत्व सांगायची गरज नाही, असा पलटवार बुधवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर केला. जिल्ह्यातील राजकारणामधील वर्चस्वावरून सध्या खडसे-महाजन यांच्यात वाद पेटला आहे.भाजपाच्या महानगर विभागाच्या विस्तारक वर्गात गुरुवारी गिरीश महाजन यांनी कुणाचेही नाव न घेता ‘सगळे माझ्यामुळेच झाले असे म्हणण्याचे दिवस गेले’, अशा कानपिचक्या दिल्या होत्या. साहजिकच त्यांचा रोख खडसे यांच्याकडे होता. शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर संबंधित वक्तव्याचा कुणाचेही नाव न घेता खडसे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, कर्तृत्ववान माणसाला त्याचे कर्तृत्व सांगण्याची गरज नसते. ज्याचे कर्तृत्व नाही त्याला प्रसिद्धी करून ते सांगावे लागते. मी काय आहे, काय केले हे शेंबडे पोरही सांगेल. राजकारणात अनेकांना नाड्या बांधायला मी शिकविल्या, तेच आज बोलत आहेत. तापी पाटबंधारे महामंडळाचा निर्णय, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आयटीआय यासारखे अनेक जनहिताचे निर्णय मी घेतले. ते सर्वांना माहीत आहे. मला कर्तृत्व सांगण्याची गरज नाही, असाही टोला त्यांनी लगावला.