शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

पेंग्विनवरून राजकारण तापले

By admin | Updated: October 25, 2016 04:42 IST

बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या पेंग्विन या परदेशी पाहुण्यांना मुंबईत आणणे शिवसेनेला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपूर्वीच भायखळा येथील राणीच्या बागेत

मुंबई : बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या पेंग्विन या परदेशी पाहुण्यांना मुंबईत आणणे शिवसेनेला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपूर्वीच भायखळा येथील राणीच्या बागेत आलेल्या आठपैकी एका पेंग्विनचा रविवारी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ‘बालहट्टा’पायी राजरोस झालेली ही हत्याच असल्याने महापालिकेविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण केले जात आहे. या प्राणिसंग्रहालयात पेंग्विन आणण्याचा निर्धार शिवसेनेने २०१२ च्या निवडणुकीपूर्वी केला होता. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वत: यात रस घेऊन परदेश दौरा करुन पेंग्विनची माहिती काढली होती. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी अडीच कोटी रुपये खर्च करुन हेमबोल्ट जातीचे आठ पेंग्विन आणले. त्यांच्यासाठी खास व्यवस्थाही प्राणिसंग्रहालयात करण्यात आली. परंतु यापैकी एका पेंग्विनचा रविवारी मृत्यू झाला.आतड्यांचा संसर्ग आणि यकृत निकामी झाल्यामुळे या पेंग्विनचा मृत्यू झाल्याचा अहवाल शवविच्छेदनानंतर समोर आला. यामुळे महापालिकेला टीकेचे धनी बनावे लागले असून प्राणिमित्र संघटनांबरोबरच राजकीय पक्षांनीही प्रशासन व सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसने या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ‘बालहट्टा’पायी ही हत्या झाल्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर प्रिव्हिन्शेन आॅफ क्रुएल्टी अगेन्स्ट अनिमल्स अ‍ॅक्ट १९६० अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही सचिन सावंत यांनी केली आहे. (प्रतिनिधी)‘त्या’ जागेच्या पाहणीची केली मागणीपेंग्विनच्या मृत्यूची गंभीर दखल घेत प्राणिमित्र संघटनांनीही सेंट्रल झू आॅथोरिटीकडे तक्रार केली आहे. उर्वरित सात पेग्विंनला ठेवण्यात आलेल्या प्राणी संग्रहालयात जागेची पाहणी करावी, अशी विनंती प्लॅन्ट अ‍ॅण्ड अनिमल्स वेल्फेअर सोसायटी मुंबई या बिगर शासकीय संस्थेने केली आहे. प्राण्यांची देखभाल चांगली ठेवण्यात येत नसल्यास प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.पेंग्विनचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते़ मात्र दीड वर्षांची डोरा ही मादी रविवारी आतड्यांच्या संसर्गाने मृत्युमुखी पडली. त्यांना देण्यात येणारे खाद्यपदार्थ त्यांना पचत नसावे, असा अंदाज बांधण्यात येत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये प्राणिसंग्रहालयातील १४० प्राणी व पक्षी मृत्युमुखी पडले आहेत.दक्षिण कोरिया येथील सेऊल महानगरातील कोएक्स मत्स्यालयातून आठ तासांचा विमान प्रवास करुन हम्बोल्ट प्रजातीचे आठ पेंग्विनचे भायखळा २६ जुलै २०१६ रोजी मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासाठी प्राणीसंग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये तळ मजल्यावर सुमारे १७०० चौफ़ूट क्षेत्रफळाचे संपूर्णपणे वातानुकूलित पेंग्विन प्रदर्शन कक्ष तयार करण्यात आला आहे़ त्याचे तापमान १६ ते १८ डिग्री अंश सेल्सिअस इतके नियंत्रित करण्यात आले आहे़ दोन कोटी ५७ लाख रुपये खर्च करुन हे पेंग्विन खरेदी करण्यात आले आहेत. या पेंग्विनच्या जीवशास्त्रीय गरजा ध्यानात ठेवून हे पक्षीगृह तयार करण्यात येत आहे. आॅस्ट्रेलियातील आॅशियानीस या कंपनीला पाच वर्षांसाठी पेंग्विनच्या देखरेखीचे कंत्राट देण्यात आले आहे़ यासाठी पालिका २० कोटी रुपये खर्च करणार आहे़