शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

राजकीय पक्षांनी पदवीधर निवडणूक लढविणे हा राज्य घटनेचा अपमान

By admin | Updated: January 22, 2017 20:47 IST

राज्य घटनेमध्ये पदवीधर निवडणूक सुशिक्षित पदवीधर व्यक्तीने लढवावी आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 22 - राज्य घटनेमध्ये पदवीधर निवडणूक सुशिक्षित पदवीधर व्यक्तीने लढवावी आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा, असे स्पष्ट केले असतानाही राजकीय पक्ष घटनेचा अपमान करीत आहेत. राजकीय पक्षांनी पदवीधर निवडणुकीपासून दूर राहिले पाहिजे; परंतु गत काही वर्षांपासून राजकीय पक्षांनी पदवीधर निवडणुकीत शिरकाव केला आणि स्वत:च्या सत्तेला बळकट करण्यासाठी व्होट बँकेचे राजकारण सुरू केले. हा राज्य घटनेचा अपमान आहे, असे स्पष्ट मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून डॉ. अविनाश चौधरी यांना विदर्भ राज्य आघाडीचे समर्थन जाहीर करण्यासाठी अॅड. अणे अकोल्यात आले होते. पदवीधर मतदारसंघामध्ये डॉ. अविनाश चौधरी यांना समर्थन जाहीर करताना, त्यांनी डॉ. चौधरी हे विदर्भ राज्य आघाडीचे उमेदवार नाहीत. डॉ. चौधरी निवडून आल्यास, ते कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाहीत. विधान परिषदेमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी ते आवाज उठवतील. या मुद्द्यावर विदर्भ राज्य आघाडीने त्यांना समर्थन दिले आहे. पदवीधर निवडणूक ही स्वतंत्र निवडणूक आहे. उच्चशिक्षित मतदारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांना त्यांचा प्रतिनिधी द्यावा लागतो. या निवडणुकीत राजकीय पक्षांशी उमेदवाराचा संबंध नसावा, अशी घटनेत तरतूद आहे; परंतु दुर्दैवाने राजकीय पक्षांचा पदवीधर निवडणुकीत शिरकाव झाला. राजकीय पक्ष स्वत:च्या चिन्हांचा पदवीधर निवडणुकीत वापर करतात आणि त्याला राजकीय रंग देतात, हे घटनाविरोधी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांचीसुद्धा पायमल्ली होत आहे, असे सांगत, अॅड. श्रीहरी अणे यांनी यासंदर्भात अपक्ष उमेदवार डॉ. अविनाश चौधरी हे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला डॉ. अविनाश चौधरी, अनिल जवादे, नीरज खांदेवाले, श्रीकांत तराळ उपस्थित होते. स्वतंत्र विदभार्बाबत भाजप उदासीनभाजप आणि काँग्रेसचा स्वतंत्र विदर्भास विरोध आहे. निवडणुका आल्या, की भाजपला स्वतंत्र विदर्भ राज्याची आठवण होते. भाजप सत्तेवर असेपर्यंत विदभार्ची निर्मिती शक्य नाही. काँग्रेस तर स्वतंत्र विदभार्ला कायमच विरोध करीत आहे. त्यामुळेच आपण विदर्भ राज्य आघाडी पक्षाची स्थापना केली. पक्ष काढणे ही सोपी बाब नाही; परंतु विचाराअंती घेतलेला हा निर्णय आहे, असेही अॅड. श्रीहरी अणे यांनी सांगितले.