होऊ दे चर्चा...
(‘मॉम’च्या यशानंतर भारतानं म्हणे लोकांना घेऊन जाणारं ‘यान’ मंगळावर पाठविण्याचा निर्णय घेतलेला. या यानात बसण्यासाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झालेली. त्याचाच हा रसभरीत वृत्तांत.)नरेंद्रभाई : (हात जोडून सर्वांचं स्वागत करत) आईयेऽऽ आईये. हमारे ‘यान कक्ष’ में आपका स्वागत.पृथ्वीराज : (लगेच मोबाईल लावत) हॅल्लो मॅऽऽडम... पिछले साल आपने भेजा हुआ रॉकेटभी अब उन्होंने ‘हायजॅक’ किया है. जसं काही त्यांच्यामुळंच ही मोहीम यशस्वी झाली, असं वातावरण तयार केलं गेलंय. काय म्हणता मॅडम? अगोदर जागेचा प्रश्न सोडवू म्हणता... ओके मॅडम. जीऽऽ मॅडम.शेट्टी : (सर्वात प्रथम यानात शिरत) बजाव शिट्टी. माझाच पहिला नंबरऽऽरामदास : (जानकरांना डिवचत) बघा. बघा. त्यांना इथं येण्यासाठी म्हणे स्पेशल विमान दिलं गेलंय. अन् आपल्या दोघांना काय? बाबूजी का टुल्लू...!जानकर : नुसत्या गप्पा मारण्यातच आपण आपला वेळ घालवतोय. अगोदर आत शिरा अन् जागा पकडा. थोरल्या काकांनी गुपचूप विनंती केली तर नरेंद्रभाई आपल्याला बाहेरही काढतील कदाचित.देवेंद्रपंत : थांबा. अगोदर आमच्या अन् उद्धोंच्या जागा फायनल होऊ द्या. त्यातून एखादी-दुसरी मागची सीट शिल्लक राहिली, तर तुम्हाला देऊ.शेट्टी : (संतापून) म्हणजे, ‘गार्ड’च्या सीटवर आम्ही तिघांनी बसायचं की काय? चला रे बाहेरऽऽ..घात झाला!उद्धो : आता मी ‘पायलट’ची खुर्ची सोडायला तयार झालोय... तिथं तुमचा प्रॉब्लेम किस झाड की पत्ती?माणिकराव : आम्ही मात्र, इतके कंजूष नाही बुवा. एका झटक्यात दहा-बारा जागा देऊन टाकल्या काकांना.प्रफुल्ल : (नव्या वादाला तोंड फोडत) पण आम्हाला ‘पायलट’ची खुर्चीही निम्मी-निम्मी हवी, तरच आम्ही यानात शिरणार!नारायण : (अस्सल ‘कोकणीबाज डोकं’ वापरत) मग चंद्रापर्यंत आम्ही त्या खुर्चीवर बसतो, नंतर तिथून पुढं तुम्ही घ्या. तेवढ्यासाठी तुमचं घोडं अडवू नका.अजितदादा : (तोंडाला पट्टी बांधल्यामुळं केवळ हातवारे करत) ऊंऽऽऊं...ऊंऽऽथोरले काका : (धास्तावून) आता हा कोणता नवा प्रयोग म्हणायचा? आपलं ‘यान’ नीट पोहोचेल नां मंगळावर?आबा : पत्रकारांना विश्वासात घेऊन मन मोकळं केलं तरीही म्हणे मीडियावाल्यांनी त्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ केली; म्हणून नाराज दादांनी सध्या मौनव्रत स्वीकारलंय. यापुढं, जो काही संवाद साधायचा तो फेसबुकवरच म्हणे !राज : (संशयानं) पण, ते ऊंऽऽऊंऽ का करताहेत? नाशकात आम्हाला काही प्रॉब्लेम तर होणार नाही नां?छगन : छे. छे. दादांचं म्हणणं असंय की, ‘मंगळावर पाणी नसेल, तर सिंचन योजनाही नसणार. मग तिथं येऊन मी काय करू?’- सचिन जवळकोटे