शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य-कला तज्ज्ञांच्या अधिकारावर राजकीय अतिक्रमण!

By admin | Updated: June 16, 2017 00:54 IST

साहित्य-कला-विज्ञान हे तिन्ही घटक राज्याला वैचारिक-वैज्ञानिक नेतृत्व देण्यासोबतच राज्याच्या सांस्कृतिक विकासही घडवून आणीत असतात. म्हणूनच राज्यघटनेने

- शफी पठाण । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : साहित्य-कला-विज्ञान हे तिन्ही घटक राज्याला वैचारिक-वैज्ञानिक नेतृत्व देण्यासोबतच राज्याच्या सांस्कृतिक विकासही घडवून आणीत असतात. म्हणूनच राज्यघटनेने या क्षेत्रातील तज्ज्ञांना राज्यहिताच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी विधान परिषदेत नियुक्तीचे अधिकार राज्यपालांना प्रदान केले आहेत. परंतु बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर महाराष्ट्राच्या निर्मितीपासून या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नियुक्तीचा हा अनुषेश कायम आहे. त्यांच्याऐवजी साहित्य-कला-विज्ञानाशी तिळमात्र संबंध नसलेले राजकीय नेतेच सदस्यत्व मिरवत आले आहेत.राज्य विधान परिषदेतील १२ जागांवर राज्यपालांनी त्यांच्या अधिकारात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करायची असते. यात साहित्य, कला आणि विज्ञान क्षेत्रांचाही समावेश आहे. या नियुक्तीचे पूर्ण अधिकार राज्यपालांचे असले तरी, वर्तमान राजकारणातील ‘प्रचलित पद्धती’नुसार मुख्यमंत्र्यांमार्फत गेलेली नावेच राज्यपाल स्वीकारत असतात. राजकारण्यांची ही चलाखी म्हणजे या क्षेत्रांतील तज्ज्ञांना घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली असून, याविरुद्ध दाद मागण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. मोजके प्रतिनिधित्वविधान परिषदेत आतापर्यंत ग. दि. माडगूळकर, ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, शांताराम नांदगावकर यांसारख्या मोजक्याच मान्यवरांनी साहित्य-सांस्कृतिक सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. या सर्व मान्यवरांनी आपल्या कार्यकाळात सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.राम नाईकांनी परत पाठवला होता प्रस्तावउत्तर प्रदेशातील तत्कालीन अखिलेश यादव सरकारनेही अशीच चलाखी करीत पूर्णत: राजकीय नावे राज्यपाल राम नाईक यांच्याकडे पाठवली होती. परंतु राम नाईक यांनी या प्रस्तावाला फेटाळून लावले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल राम नाईक यांच्या या आदर्श उदाहरणाचाही ‘अभ्यास’ करायला हवा, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात या विषयावर ठराव समंत करून आम्ही मुख्यमंत्री व राज्यपालांचे लक्ष वेधले होते. परंतु दखल घेतली नाही. आता पुन्हा मी या दोघांना स्मरणपत्र लिहून हा अनुशेष भरण्याची मागणी केली आहे. याबाबतची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केल्याने मनस्ताप होत असून, न्याय मिळणे दूरच राहिले वकिलावरच पैसे खर्च करावे लागत आहेत.- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ