शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय उदासीनता : संस्थात्मक पडझडीच्या काळात स्मारकाच्या उभारणीला १४ वर्षांचा अडथळा

By admin | Updated: November 13, 2014 00:02 IST

--वसंतदादा जयंती विशेष---संस्थात्मक उभारणी आणि प्रगतीच्या पंखांना बळ देणाऱ्या तुमच्यासारख्या नेतृत्वाला अवघा जिल्हा सलाम करतो. तरीही

अविनाश कोळी - सांगली --‘आदरणीय वसंतदादा..! हा जिल्हा तुमच्या नावाने ओळखला जातो. संस्थात्मक उभारणी आणि प्रगतीच्या पंखांना बळ देणाऱ्या तुमच्यासारख्या नेतृत्वाला अवघा जिल्हा सलाम करतो. तरीही तुम्ही उभारलेल्या संस्थांची सध्याची पडझड तुमच्या आत्म्याला प्रचंड वेदनादायी ठरत असणार, यात शंका नाही. तुमच्यावर प्रेम करणारे असंख्य सांगलीकरही अशाच वेदनांनी त्रस्त आहेत. जिथे संस्थाच मोडकळीस येत आहेत, तिथे नव्याने उभारणाऱ्या स्मारकाची काय वेगळी अवस्था असणार आहे? तब्बल १४ वर्षांचा वनवास या स्मारकाच्या उभारणीला झाला. तरीही अजून तुमच्या स्मृतींना वास्तुरुपात जतन करण्याच्या मनोदयाला मूर्तस्वरुप प्राप्त होऊ शकले नाही, हे या सांगली जिल्ह्याचे दुर्दैव.’ ‘तुमचे नाव तसे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कक्षा रुंदावत देशपातळीपर्यंत पोहोचले. म्हणूनच दादाप्रेमींची संख्याही राज्यात आणि देशाच्या अनेक भागात मोठी आहे. राज्यातील अनेक नेत्यांनीही तुमच्या कार्याची उदाहरणे भाषणांमधून दिली. सहकारमहर्षी म्हणून तुमचा गौरवही केला जातो. अशा या जिल्ह्यात आणि राज्यात तुमच्या स्मारकाच्या व्यथेची कहाणी १४ वर्षांपासून सुरू आहे. जिथे एकेका मतदारसंघातील निवडणुकांमधून ५0 ते १00 कोटींचा चुराडा सहजासहजी केला जातो, तिथे तुमच्या स्मारकाला अवघे ९ कोटीही मिळू शकत नाहीत! त्यासाठी १४ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागते. परिस्थितीचा आढावा घेतला, तर औपचारिकता म्हणून स्मारकाची इमारत उभारण्यात येत आहे की काय?, अशी शंका आता दादाप्रेमींना येत आहे. मंत्र्यांची खाण म्हणून या जिल्ह्याची राज्यात ओळख. तीन-चार मंत्रीपदे याठिकाणी ठरलेली असतात. खातीही साधीसुधी नसतात. मोठमोठ्या खात्यांची मंत्रीपदे जिल्ह्याला मिळूनही तुमच्या स्मारकासाठी शासनाकडे वारंवार हात पसरावे लागतात. एका तपाहूनही अधिक काळ या स्मारकाच्या निधीसाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कधी ५0 लाख, कधी १ कोटी, तर कधी २ कोटी रुपये पदरात पडतात. तेवढ्याच पैशात होईल तेवढे काम करून पुन्हा शासनाकडे तोंड करून याचना करायची, अशी केविलवाणी अवस्था या सांगली जिल्ह्याची झाली आहे. तुमची संस्थात्मक उभारणीतील तत्परता आणि आताची राजकीय उदासीनता यांचा विचार केला, तर आणखी काही वर्षे तुमच्या स्मारकाला प्रतीक्षा करावी लागली, तर आश्चर्य वाटणार नाही. वर्षातून जयंती आणि पुण्यतिथीला तुमच्या पुतळ्याची स्वच्छता आणि पूजन तेवढे केले जाईल. तेवढ्यात दादा समाधान मानून घ्या! कारण तुमच्या वेदनांची कदर आता इथे कोणालाही राहिली नाही. दादा, तुम्हीही आता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य दादाप्रेमींसारखे वास्तव स्वीकारायलाच हवे. पर्याय कोणताही नाही.’म्हणे निधी आला....वसंतदादा स्मारकासाठी म्हणे आता अडिच कोटी रुपयांचा निधी आला आहे. या निधीतून पुढील कामे करता येतीलही. परंतु उर्वरित आणखी साडेतीन कोटीच्या निधीसाठी पुन्हा राज्य शासनाचे उंबरठे झिजवावेच लागणार आहेत. त्यामुळे वसंतदादा स्मारकाचे दुखणे, अडथळे अजूनही संपलेले नाहीत. निधीच्या अडथळ्यांची शर्यत आता १४ वर्षांवरून १५ किंवा १६ वर्षांवर गेली, तर त्याचे कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.