शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे सीबीआयला असहकार्य

By admin | Updated: July 27, 2015 00:39 IST

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचा तपास सीबीआयकडे देऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र राज्य

लातूर : नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचा तपास सीबीआयकडे देऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र राज्य पोलिसांचे त्यांना सहकार्य मिळत नसल्याने तपासात प्रगती झालेली नाही, असा खळबळजनक आरोप डॉ. हमीद दाभोळकर यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत केला.केंद्र व राज्य शासन गांभीर्याने हा तपास करीत नाहीत, असे ते म्हणाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानाची सुरुवात रविवारी येथे झाली. दाभोळकर म्हणाले, सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याची गेल्या सहा महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. शिवाय, सीबीआयचे कार्यालय बेलापूरमध्ये आणि गुन्हा घडल्याचे ठिकाण पुणे आहे. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. दाभोळकरांच्या कुटुंबियांना तपासाबाबत माहिती दिली जात नाही. त्याचा निषेध म्हणून ‘नरेंद्र दाभोलकर के हत्यारों को कब पकडा जाएगा’ या आशयाचे एक लाख पत्र राष्ट्रपतींना पाठविले जाणार आहे. दाभोळकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी व तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ प्रबोधन अभियानाची सुरुवात येथे झाली. ७, ८ व ९ आॅगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम होणार आहे. त्यात विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद होणार असून, जात पंचायत मुक्तीच्या कायद्याला राज्य शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणीही केली जाणार असल्याचे डॉ. दाभोळकर व माधव बावगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)