शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

डीसीसीतील आरोपींच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 20:09 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणातील तीन गुन्ह्यांचे आरोपपत्र पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सादर केले.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 12 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणातील तीन गुन्ह्यांचे आरोपपत्र पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सादर केले. तथापि, हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले असले तरी पोलिसांचा ससेमिरा सुटलेला नाही. आरोपींच्या बारीक- सारीक हालचालीवंर पोलिसांची करडी नजर आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, खा. रजनी पाटील या विद्यमान लोकप्रतिनिधींसह १११ जण वाँटेड आहेत. यात जिल्हा बँकेच्या माजी संचालकांसह अन्य बड्या राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.विखे पाटील सहकारी साखर कारखाना, अंबा सहकारी साखर कारखाना व संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणी या संस्थांच्या संदर्भातील हे प्रकरण आहे. अनुक्रमे खा. रजनी पाटील, भाजपचे रमेश आडसकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या या संस्था आहेत.  तिन्ही संस्थांचा मिळून ३२ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्हार आहे. त्यामुळे राजकीय व सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष पथकामार्फत नव्याने झालेल्या तपासात ४०९ व ४०६ ही कलमे वाढली असून आरोपींची संख्याही वाढली आहेत. त्यामुळे गैरव्यवहाराचे आरोप असलेल्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.कोणी सहलीवर, कोणी नातेवाईकांकडे !या प्रकरणात एकूण १११ आरोपींचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांसह कर्जदार संस्थांचे संचालकही गोत्यात आहेत. शिवसेना वगळता सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यात आरोपी आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे विदेश दौऱ्यावर असून रविवारपासूनच इतर आरोपी भूमिगत आहेत. कोणी सहलीवर गेले असून काहींनी नातेवाईकांकडे आश्रय घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. अटक टाळण्यासाठी अनेकांनी आपले भ्रमणध्वनी बंद करुन संपर्काबाहेर राहणे पसंद केले आहे.तीन गुन्ह्यांच्या तपासाचा प्रगीत अहवाल मंगळवारी खंडपीठात सादर करावयाचा होता; परंतु तारीख पुढे ढकलली आहे. आता खंडपीठाने आदेशीत केलेल्या तारखेला अहवाल सादर केला जाईल. आरोपींवर आमचे लक्ष आहे. ते आढळल्यास त्यांना न्यायालयासमोर हजर करु. -अनिल पारसकर पोलीस अधीक्षक, बीड.