शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

चोरट्यांच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू

By admin | Updated: November 17, 2014 04:21 IST

चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या डोंगरी पोलीस ठाण्यातील अजय गावंड (४३) या पोलीस शिपायावर चोरट्यांनीच हल्ला केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

मुंबई : चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या डोंगरी पोलीस ठाण्यातील अजय गावंड (४३) या पोलीस शिपायावर चोरट्यांनीच हल्ला केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. यामध्ये या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला असून, त्यांच्या या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुळचे मुलुंड येथील राहणारे गावंड २० वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते डोंगरी पोलीस ठाण्यातील डिटेक्शन विभागात काम करीत होते. काल रात्रपाळी असल्याने पोलीस ठाण्यातच असताना वाडीबंदर येथील पी. डी. रोड परिसरातील भारत पेट्रोलियम इमारतीत चोर शिरल्याची महिती डोंगरी पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली. याच परिसरात गस्त घालणारे दोन पोलीस शिपाई त्या ठिकाणी पोहोचले. मात्र पोलिसांनी पाहताच संतोष साळवी (३५) या चोरट्याने इमारतीच्या छताकडे धाव घेत छताचा दरवाजा बंद केला. त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी जाता येत नव्हते. त्यातच आरोपीने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केल्याने पोलीस शिपायांनी पोलीस ठाण्यात फोन करून अधिक मनुष्यबळ पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार डिटेक्शनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात आणि गावंड तसेच अन्य तीन शिपाई घटनास्थळाकडे रवाना झाले. या पथकातील काही पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.याचवेळी गावंड यांनी येथील एका रहिवाशाची मदत घेत एका घराच्या खिडकीतून टेरेसवर प्रवेश केला. पोलीस टेरेसवर पोहोचल्याने सर्वच मार्ग बंद झाल्याचे या चोरट्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तो पळू लागला. याच दरम्यान गावंड यांनी त्याच्यावर झडप घालताच चोरट्याने बाजूलाच पडलेल्या लाकडी बांबूने गावंड यांच्यावर हल्ला केला. (प्रतिनिधी)