शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाचे कुटुंबच झाले होत्याचे नव्हते

By admin | Updated: August 4, 2014 03:19 IST

माळीण गावामध्ये झालेल्या दुर्घटनेत पुणे शहर पोलीस दलातील निवृत्ती विठ्ठल झांजरे या हवालदाराचे संपूर्ण कुटुंबच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले

पुणे : माळीण गावामध्ये झालेल्या दुर्घटनेत पुणे शहर पोलीस दलातील निवृत्ती विठ्ठल झांजरे या हवालदाराचे संपूर्ण कुटुंबच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आई, तीन भाऊ, भावजया, त्यांची मुले, सुना आणि नातवंडे असे १९ जणांचे कटुंब काळाने हिरावून नेले. ढिगाऱ्याखालून त्यांच्या काही नातेवाइकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर काहींसाठी शोध सुरू आहे.आयुक्तालयातील विशेष शाखेमध्ये कार्यरत निवृत्ती झांजरे यांना ३० जुलै रोजी सकाळीच माळीण दुर्घटनेची माहिती मिळाली. वरिष्ठांची परवानगी घेऊन झांजरे गावाकडे रवाना झाले. निवृत्ती झांजरे यांचे आई हौसाबाई, थोरले भाऊ श्रावण, त्यांच्या पत्नी सीताबाई, सून सविता आणि तीन वर्षांची नात हे राहात होते. त्यांच्या शेजारीच त्यांचे धाकटे बंधू गोविंद, त्यांची पत्नी रोहीबाई, मुलगा संदीप, सून नीना आणि अवघ्या दीड वर्षाचं बाळ सुयश राहत होते. लागून असलेल्या घरामध्ये राहणारे तिसरे बंधू गेणुभाऊ, त्यांची पत्नी देऊबाई, मुलगा मंगेश, सून नंदा त्यांच्या तीन मुली, यासोबतच त्यांचा दुसरा मुलगा रवी, पत्नी मनीषा आणि मुलगी ईश्वरी हे सर्व जण या दुर्घटनेचे बळी ठरले. श्रावण हे एका खासगी कंपनीमधून निवृत्त झालेले होते. त्यांची तीनही मुले पुण्यात राहतात. येथेच नोकरीला आहेत. यापैकी दुसरा मुलगा सखाराम याची पत्नी तीन वर्षांच्या मुलीला घेऊन शेतीच्या कामामध्ये मदत करण्यासाठी माळीणला आली होती. त्यांच्यावरही काळाने घाला घातला. गोविंद यांचा मुलगा संदीप हा मलेरिया सर्व्हेलन्स म्हणून काम करीत होता. गेणुभाऊ हे गावामध्ये राहूनच शेती करीत होते. त्यांची मुले मंगेश आणि रवी त्यांना शेतीच्या कामात मदत करत होते, अशी माहिती निवृत्ती झांजरे यांच्या पत्नी कल्पना यांनी दिली.