शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची किटपेटी निवृत्तीनंतरही त्यांच्या सोबत राहणार!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 21:07 IST

पोलीस दलात रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यतच्या दिर्घप्रवासापर्यत अधिकारी व अंमलदारांच्या सोबत असणारी किट पेटी (ट्रंक) आता आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. निवृत्तीनंतर ती पोलीस मुख्यालयात जमा करण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ३०-३५ वर्षाच्या प्रवासात सोबत असणाºया पेटीशी भावनिक नाते जोडले गेल्याने रिटायरमेटनंतर त्यांना भेट स्वरुपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- जमीर काझी मुंबई, दि. 17 - पोलीस दलात रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यतच्या दिर्घप्रवासापर्यत अधिकारी व अंमलदारांच्या सोबत असणारी किट पेटी (ट्रंक) आता आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. निवृत्तीनंतर ती पोलीस मुख्यालयात जमा करण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ३०-३५ वर्षाच्या प्रवासात सोबत असणाºया पेटीशी भावनिक नाते जोडले गेल्याने रिटायरमेटनंतर त्यांना भेट स्वरुपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पोलीस मुख्यालयात मध्यवर्ती पोलीस कल्याण निधी समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील दोन लाखावर पोलीस अंमलदारांना आठवण म्हणून भेट स्वरुपात आपल्याजवळ बाळगता येणार आहे.खात्यात भरती झाल्यानंतर प्रशिक्षणाला हजर झाल्यानंतर प्रत्येक पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलना खात्याकडून मिळालेले गणवेष किट ठेवण्यासाठी लोखंडी मजबूत पेटी दिली जाते. त्याला गणवेष किट असे संबोधण्यात येते. अंमलदारांने गणवेष, टोपी, बॅँच, लाईन यार्ड, पट्टा तसेच दैनदिन वापरासाठी लागणारे साहित्य त्याला एकत्र ठेवता यावी, जेणेकरुन नियुक्तीच्या ठिकाणी गेल्यास त्याला आवश्यक साहित्य सहजपणे उपलब्ध व्हावे, हा त्यामागचा हेतू आहे. ब्रिटीश काळापासून ही पद्धत अनुसरली जात आहे. बंदोबस्ताच्या ठिकाणी, तसेच पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर आपली किट पेटी खराब होवू नये तसेच सहजपणे ओळखली जावी, यासाठी त्याला रंगवून आपले नाव व बक्कल नंबर लिहून ठेवतात. खात्यात कार्यरत असेपर्यत सुमारे ३५,३८ वर्षे ही पेटी सोबतच ठेवत असतात. अंमलदार असल्याने त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी स्वतंत्र खोली मिळू शकत नाही. त्यामुळे या गणवेष कीटमध्ये ते आपले साहित्य ठेवत असतात.अधिक वाचा- शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचा सन्मानपोलीस वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराची लागणमात्र पोलीस रिटायर झाल्यानंतर त्यांना ती कार्यरत असलेल्या पोलीस मुख्यालयात जीर्ण व जुनी झालेली लोखंडी पेटी जमा करणे बंधनकारक असते. त्याशिवाय त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. पोलीस दलाची आठवण म्हणून ती आपल्या सोबत रहावी, अशी अंमलदारांची इच्छा असते. त्यामुळे ती अंमलदारांना देण्यात यावी, अशी मागणी नांदेडमधील सहाय्यक फौजदार ढगे यांनी केली होती. मध्यवती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस नियमावलीतील भाग २ नियम १०(५) मधील तरतुदीनुसार घटकप्रमुखांनी त्याबाबत निर्णय घ्यावा, कीटपेटी इतरांना वापरण्या योग्य नसल्यास ती संबंधित अंमलदारांकडे राहू देण्यात यावी, असे निर्देश दिले.पोलिसांना किटपेटी सदैव वापरावी लागत असल्याने त्याच्याशी एक भावनिकता निर्माण झालेली असते.इतक्या वर्षानंतर ती दुसºयाला वापरण्याजोगे नसल्याने ती संबंधित कर्मचाºयाला देण्याबाबत घटकप्रमुखांना अधिकार देण्यात आला आहे.-सतीश माथूर (पोलीस महासंचालक)