शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसही करणार योगासने

By admin | Updated: June 20, 2016 03:58 IST

राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असणाऱ्या सव्वा दोन लाखांवरील खाकी वर्दीवाल्यांपैकी बहुतांश जण मंगळवारी कपालभाती

जमीर काझी, मुंबईराज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असणाऱ्या सव्वा दोन लाखांवरील खाकी वर्दीवाल्यांपैकी बहुतांश जण मंगळवारी कपालभाती, अनुलोम-विलोमचे धडे घेताना पाहावयास मिळणार आहेत. या योगसाधनेचा मुहूर्त जुळून आला आहे, तो ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने. २१ जूनला साजऱ्या होणाऱ्या या दिनानिमित्य राज्यातील सर्व पोलीस विभागांत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक व अन्य घटक प्रमुखांना त्याबाबत आदेश दिले आहेत. ओम योगविद्या गुरुकुल संस्थेमार्फत कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे. जास्ती जास्त अधिकारी-कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतील, या दृष्टीने प्रशिक्षण शिबिराचे ठिकाण व वेळेची निश्चिती करावयाची आहे.सध्याच्या धावपळीच्या युगात मानवाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ हरवून जात आहे. त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय संस्कृतीचे एक प्रतीक असलेल्या योग साधनेकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. २१ जून रोजी जगभरात ‘योग दिन’ साजरा केला जात आहे. त्या निमित्त योगासनाचे मानवी जीवनातील महत्त्व व गरज विषद केली जात आहे. पोलिसांना बंदोबस्तामुळे ताण-तणावाखाली वावरावे लागते. त्यामुळे निरोगी राहाण्यासाठी पोलिसांनाही नियमित व्यायाम व योगासने करणे अत्यावश्यक बनले आहे. त्याबाबत अधिक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जागतिक योग दिनी अधिकाधिक योग शिबिर घेण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. त्यासाठी राज्यातील सर्व पोलीस विभागांत तो राबविला जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग चालविणाऱ्या ओम योग गुरुकुलचे सहकार्य घेतले जाणार आहे. संस्थेचे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये, तसेच प्रमुख शहरांमध्ये शाखा व पदाधिकारी आहेत. घटकप्रमुख त्याच्याशी संपर्क साधून योग वर्गाचे नियोजन करणार आहेत. या वेळी योग प्रशिक्षक महत्त्वाचे योग व त्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. मोठे क्रीडांगण किंवा पाऊस असल्यास बंदिस्त सभागृहामध्ये हा वर्ग घेतला जाईल. त्यामध्ये जास्तीत जास्त अधिकारी व अंमलदारानी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना दीक्षित यांनी केली आहे. त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल २७ जूनपर्यंत पोलीस मुख्यालयात पाठवावयाचा आहे.